जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:05 AM2019-07-10T00:05:33+5:302019-07-10T00:06:34+5:30

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली.

Only 26 percent sown in the district | जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

जिल्ह्यात केवळ २६ टक्के पेरण्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीची कामे आता वेगात सुरु झाली आहेत. आतापर्यंत १ लाख १५ हजार ३१२ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली. एकून लागवड क्षेत्राच्या २६ टक्के पेरणा झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
खरीप हंगामासाठी ४ लाख ३५ हजार ५२२ हेक्टर कृषी विभागाने नियोजन केले होते. त्यामध्ये भात १ लाख ८० हजार १९६ हेक्टर, सोयाबिन ४९, ७५० तर कपाशी १ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर लागवड होणे शिल्लक आहे. त्यापैकी कपाशीची लागवड ७७ हजार ४६५ हेक्टरवर करण्यात आली. सोयाबिन पिकांची लागवड ८ टक्के झाली. भात पिकांचे ४ हजार ^६८७ हेक्टर क्षेत्रावर पºहे टाकण्यात आले. ४ हजार ६९६ हेक्टर आवत्या भाताची पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी अवघी ४ टक्के आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाऊस पडतो. मात्र, यावेळी जून महिन्याचा पंधरवडा लोटला. तरी पावसाला सुरुवातच झाली नव्हती. मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. दरम्यान २० जून रोजी एकदा पाऊस पडल्यांनतर काही काही शेतकºयांनी धूळपेरणी केली. मात्र ९० टक्के पेरण्या खोळंबल्या होत्या. बºयापैकी पाऊस येईपर्यंत पेरणी करुन नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. दरम्यान मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन व कपाशीची लागवड जोरात सुरू आहे. यंदा पाऊस उशिरा आल्याने रोवण्यावर लांबणीवर जाणार आहेत.

Web Title: Only 26 percent sown in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती