चंद्रपूर जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पात केवळ २८ टक्केच पाणीसाठा!

By राजेश भोजेकर | Published: April 18, 2023 03:59 PM2023-04-18T15:59:13+5:302023-04-18T16:07:05+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत

Only 28 percent water storage in 11 irrigation projects in Chandrapur district! | चंद्रपूर जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पात केवळ २८ टक्केच पाणीसाठा!

चंद्रपूर जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पात केवळ २८ टक्केच पाणीसाठा!

googlenewsNext

चंद्रपूर : यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

लभनसराड जलाशयात केवळ २४ टक्के पाणीसाठा आहे. नालेश्‍वर ३७ टक्के, चारगाव ३३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच असोलामेंढा ८१.३७, घोराझरी १९, अमलनाला ३०, पकडीगुड्डम ३१, डोंगरगाव ६५, इराई ५३.१७ टक्के पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यात या धरणांची हीच अवस्था अशीच राहिल्यास येत्या काळात नागरिकांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते. धरणांची स्थिती बिकट असतानाही जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे. उद्योगांना पाणी मिळत आहे, मात्र शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचा आरोपही होत आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला मात्र त्याचा जलाशयांवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपूर यावर्षी उन्हाळा चांगलाच तापणार असल्याचा तथा पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर उन्हाचा पारा ४३.२ अंश सेल्सिअस पर्यंत गेला आहे. उन्हाचा परिणाम सिंचन प्रकल्प व तलावातील पाणी केवळ २८ टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्र झळ सोसावी लागणार आहे.

यंदा चांगला पाऊस होऊनही जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील एक जलाशय रिकामा झाला आहे, तर दुसऱ्याची अवस्था बिकट आहे. यावर्षी अतिवृष्टीसह अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली, पावसाळ्यात जिल्ह्यातील नद्या, नाले, जलाशय दुथडी भरून वाहत होते. मात्र उन्हाळा सुरू होताच जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला. जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती पाहता भविष्यात गंभीर जलसंकटातून जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ जलाशयांपैकी चंदई प्रकल्प कोरडा झाला आहेत. अशा स्थितीत लभनसराड प्रकल्प कोरडा होण्याच्या मार्गावर आहे.

यंदाचा पाऊस पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याचे संकट ओढवणार नाही, असा अंदाज होता. मात्र हे चित्र बदलताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या अहवालानुसार एक जलाशय रिकामा झाला असून दुसऱ्याची स्थिती गंभीर होत आहे. या जलाशयांमध्ये केवळ २८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे येत्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इरई धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. सध्या धरणात केवळ ५३.१७ टक्के पाणीसाठा आहे. अशा स्थितीत शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

इरई धरणाची पाणी साठवण क्षमता १७२.१५ (दलघमी) आहे. मात्र, आजमितीस धरणात केवळ ९१.५३ (दलघमी) पाणीसाठा आहे. जे ५३.१७ टक्के असल्याचे सांगण्यात आले. इराई धरणातून चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र आणि शहराला पाणीपुरवठा होतो, त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Only 28 percent water storage in 11 irrigation projects in Chandrapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.