शेतकरी शास्त्रज्ञ बनला तरच शेती समृद्ध

By admin | Published: June 2, 2016 02:39 AM2016-06-02T02:39:13+5:302016-06-02T02:39:13+5:30

निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे.

Only after farming became a scientist | शेतकरी शास्त्रज्ञ बनला तरच शेती समृद्ध

शेतकरी शास्त्रज्ञ बनला तरच शेती समृद्ध

Next

अमृत देशमुख यांचे प्रतिपादन : कापूस शेतकरी मेळावा
चिमूर : निसर्ग, शेती, अध्यात्म, विज्ञान यामध्ये कितीही संशोधन केले तरी ते अपुरेच आहे. शेती विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी तंतज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाने शेतकरी शेती करू लागला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्याच शेतीच्या माध्यमातून शेतीचे संशोधन करुन शास्त्रज्ञ झाले पाहिजे. तरच शेती समृद्ध होईल, असे मत चिमूर कॉटन इंडस्ट्रीच्या वतीने शेतकरी भवनात आयोजित कापूस शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शनात अमृत पॅटर्नचे जनक अमृत देशमुख यांनी व्यक्त केले.
कापूस शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम मालोदे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक आॅफ महाराष्ट्र चंद्रपूरचे झोनल मॅनेजर संजय हिरेमठ, चिमूर नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, चिमूर सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष दादा दहीकर, कृउबा समितीचे उपसभापती गोपाल बलबुवा, नगरसेविका छाया कंचर्लावार, नगरसेविका सतिश जाधव, चिमूर कॉटन इंडस्ट्रीचे संचालक सचिन खाले, कृषी मार्गदर्शक अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख, डॉ. प्रशांत राखोंडे, कृषी मार्गदर्शक एम.एस. वरभे कार्यक्रमाला उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गर्शदन करताना अमृत देशमुख पुढे म्हणाले, जमिनीची मशागत करण्यासाठी आज शेतकरी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तरी टॅक्टरच्या साहयाने बरेच शेतकरी ऐन पेरणीच्या वेळी नागरणी करतात. ही चुकीची पद्धत असून जमिनीची मशागत खरीप रबी पिकाची काढणी पूर्ण झाल्यानंतर एप्रिल महिन्यात करावी. रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर करावा. रासायनिक खताने शेती काही दिवसांनी बजर होते व शेती पिकणार नाही. शेणखत नसून जिवाणूचे खाद्य आहे म्हणून रासायनिक खत व्यवस्थापक, सूर्य प्रकाश, पाणी व्यवस्थापक जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच शेणखताची प्रक्रिया महत्वाची आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक बकाराम मालोदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, या परिसरात शेतकऱ्यांच्याच मुलांनी जिनिंग उभी करुन शेतकऱ्यांसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध करुन तसेच शेतकीहीताचे कार्यक्रम राबविला जात आहे. याच माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस बाजार समितीतील सेसच्या माध्यमातून बाजार समिती चिमूरच्या उत्पन्नात भर टाकत आहे. जिनिंगमुळे रोजगार व परिसरातील उलाढाल वाढीकरिता मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. या कापूस शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Only after farming became a scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.