अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:36 PM2017-10-22T23:36:43+5:302017-10-22T23:36:54+5:30

आत्मा, पुनर्जन्म आदी कल्पना अवैज्ञानिक आणि पुरोहितशाहीच्या हितरक्षणासाठी पोषक आहेत. जनसामान्यांच्या शोषणासाठी या संकल्पनांचा वापर करण्यात आला.

Only after giving up on superstition, only progress in life | अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती

अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती

Next
ठळक मुद्देदिलीप सोळंके : बॅ. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आत्मा, पुनर्जन्म आदी कल्पना अवैज्ञानिक आणि पुरोहितशाहीच्या हितरक्षणासाठी पोषक आहेत. जनसामान्यांच्या शोषणासाठी या संकल्पनांचा वापर करण्यात आला. आजही हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे समाजाने विवेकवादावर आधारीत जीवन पद्धतीचा अवलंब करावा आणि अंधश्रद्धांचा त्याग करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केल्यास मानवी जीवन सुखी होऊ शकते, असे प्रतिपादन अ. भा. अंनिसचे राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी केले. स्मृतीशेष मुद्रीकाबाई अडकिणे यांच्या स्मृतीनिमित्त स्थनिक बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अ. भा. अंनिस शाखा चंद्रपूर व अडकिणे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी मंचावर डी. के. आरीकर, हिराचंद्र बोरकुटे, आनंद शेंडे, भालचंद्र जगताप, प्रविण खोबरागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्मृतीशेष मुद्रीकाबाई अडकिणे यांनी मरणोत्तर देहदान केले. विभिन्न वक्त्यांनी त्यांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे औचित्य साधून देहदानाचा संकल्प करणारे डॉ. प्रल्हाद भिवाजी भडके यांना अ.भा. अंनिसतर्फे देहदान संकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर स्मृतीशेष मुद्रिकाबाई अडकिणे यांना मरणोत्तर देहदान पुरस्कार गौरविण्यात आले.
तेरवी अथवा तत्सम विधी टाळून त्यांचा १५ हजारांचा निधी बाबुपेठ येथील विहार बांधकामास देणगी रुपाने प्रदान करण्यात आला. दिलीप सोळंके म्हणाले, विज्ञानाच्या माध्यमातून मानवाचा विकास झाला. विज्ञानाशिवाय कोणताही माणूस प्रगती करू शकत नाही. धर्माच्या नावावर लुटणाºया धर्मांध व्यक्तींनी सर्वसामान्य जनतेच्या शोषण करण्याचे काम केले. मात्र, विज्ञान आणि परिवर्तनाचा वारसा सांगणाºया महापुरूषांनी विद्रोह पुकारुन जनतेचे प्रबोधन केले. हा वारसा आजच्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडला पाहिजे, असेही दिलीप सोळंके यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, निलेश पाझारे, प्रेम गावंडे, अनिल रायपूरे, शिरीष गोगुलवार, विलास बनकर आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी प्रबोधनकारी चळवळीतील कार्यकर्ते, अडकिणे परिवारातील सदस्य व हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Web Title: Only after giving up on superstition, only progress in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.