कोरपनासाठी वणी आगारातून केवळ आठच बसफेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:30 AM2020-12-06T04:30:07+5:302020-12-06T04:30:07+5:30

वणीवरून कोरपनासाठी सकाळी ६.३०, ७.३०, ८.१५, ८.३०, १०.१५, दुपारी १.३०, ३.००, सायंकाळी ७.०० यावेळेस नियोजित अशा आठ ...

Only eight buses ply from Wani depot for Korpana | कोरपनासाठी वणी आगारातून केवळ आठच बसफेऱ्या

कोरपनासाठी वणी आगारातून केवळ आठच बसफेऱ्या

googlenewsNext

वणीवरून कोरपनासाठी सकाळी ६.३०, ७.३०, ८.१५, ८.३०, १०.१५, दुपारी

१.३०, ३.००, सायंकाळी ७.०० यावेळेस नियोजित अशा आठ बसेस आहे. मात्र यातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्हीकडील जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. वणी ही कोरपना, गडचांदूर, जिवती परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नियमित विविध वस्तूच्या खरेदीसाठी नागरिक येत असतात. मात्र या मार्गावर दळणवळणाची साधने अत्यल्प असल्याने प्रवशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. याबाबत अनेकदा वणी आगाराचे लक्ष वेधून ही त्यांचे याकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे येथील आगाराची जबाबदारी बदलून वरोरा व राजुरा आगाराला पूर्णतः देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच वणीवरून सकाळी नऊ, दुपारी दोन, चार, पाच वाजता बसफेऱ्या सोडण्यात याव्या, अशी अपेक्षा प्रवाशीदृष्ट्या सोयीसाठी व्यक्त होत आहे.

बॉक्स

वरोरावरून थेट सुरू कराव्या बसेस

वरोरा येथून वणी, कोरपनासाठी थेट नियमित बस सेवा सुरू करण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वरोरावरून बस सेवा सुरू केल्यास या मार्गावर थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीचे होईल. तसेच वरोरा ते वणी, वणी ते कोरपना यादरम्यान वाहतुकीला चालना मिळेल.

Web Title: Only eight buses ply from Wani depot for Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.