नामांकन दाखल करण्यासाठी केवळ चार दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:21 AM2020-12-27T04:21:00+5:302020-12-27T04:21:00+5:30
तालुक्यात ८५ ग्रामपंचायतच्या २६३ वार्डासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन ऑनलाइन सादर झाले ...
तालुक्यात ८५ ग्रामपंचायतच्या २६३ वार्डासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन ऑनलाइन सादर झाले नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. येथील राजीव गांधी सभागृहात निवडणूक प्रक्रियेचे सर्व कामकाज पार पडत आहे. यासाठी वेगवेगळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना संगणक तसेच सहायक आणि ऑपरेटर यांची नियुक्ती आलेले नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी निवडणूक विभागाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाचे सर्वच विभाग ऑनलाइन होत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे पारंपरिक पद्धतीऐवजी संगणकीकृत पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्रे भरण्यापासून उमेदवार निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही पार पडेपर्यंतचे सर्व टप्पे आयोगाच्या आज्ञावलीनुसार संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार डाँ विजयकुमार सूर्यवंशी यांनी दिली.