दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात मुलींचीच पताका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 05:00 AM2022-06-18T05:00:00+5:302022-06-18T05:00:16+5:30
चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा पंचभाई तसेच नेवजाबाई विद्यालयाची ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे या तीन विद्यार्थिनींनी ९७. ४० टक्के मिळवून द्वितीय आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंंद्रपूर : दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे ही ९८.२० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली, तर वरोरा येथील हिरालाल लोया विद्यालयाची नंदिनी वसंतराव बरडे व ब्रह्मपुरी येथील ख्रिश्चानंद हायस्कूलची स्नेहा पंचभाई तसेच नेवजाबाई विद्यालयाची ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे या तीन विद्यार्थिनींनी ९७. ४० टक्के मिळवून द्वितीय आल्या आहेत.
कोरोना संकटामुळे गतवर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गतवर्षी परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला होता. परीक्षाविना निकाल दिल्याने उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याही वाढली होती. यंदा २८ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यामध्ये १५ हजार १४ मुली व १३ हजार ९३८ मुलांचा समावेश होता. यापैकी १४ हजार ७५४ मुली व १३८११ अशा एकूण २८ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
त्यातून १३ हजार ९५८ मुली व १३ हजार ४५७ असे एकूण २४ हजार ४१५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९७.४३ तर मुलांची टक्केवारी ९४. ६० आहे. नवरगाव येथील भारत विद्यालयाची खुशी योगेश पडोळे हिने ९८. २० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून पहिली आली. तब्बल ४ हजार १४८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले.