चुकीचे सर्व्हेक्षण रद्द करून पात्र व्यक्तींनाच मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:56 AM2020-12-11T04:56:47+5:302020-12-11T04:56:47+5:30
किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती ...
किन्ही येथील पूरग्रस्तांची मागणी : उपविभागीय अधिकाºयांना निवेदन
ब्रह्मपुरी : वैनगंगा नदीच्या महापूराने तालुक्यातील किन्ही गाव तसेच शेती पूर्णत: जलमय झाले होते. ८० घरे जमीनदोस्त तर शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके नेस्तनाबूत झाले. तयामुळे यापूर्वीचे चुकीचे सर्वेक्षण रद्द करून नव्या सर्वेक्षणानुसार पात्र व्यक्तींनाच शासकीय मदत देण्याची मागणी किन्ही येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे.
गोसेखुर्द नहराची पाळ फुटल्याने अनेक शेतकºयांच्या शेतीचे वाळवंटात रुपांतर झाले. पूर ओसरल्यानंतर शासनाने चार दिवसात तलाठी, ग्रामसेवक व शासकीय कर्मचाºयांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण पूर्ण केल. परंतु बरेच दिवस उलटले तरीसुद्धा ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थ्यांची यादी प्रकाशित झाली नाही. पूरग्रस्तांची मागणी लक्षात घेऊन ४ डिसेंबरला ग्रामपंचायत कार्यालयात यादी लावण्यात आली. यादीत ज्यांचे नुकसान झाले त्यांची नावे वगळून चुकीची नावे पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप नागरिकांनी केला. जे व्यक्ती पूरपीडित नाही त्यांची नावे यादीत कशी आली, असा प्रश्न निवेदनातून विचारला आहे.
नुकसानग्रस्तांमध्ये संताप
नुकसान झालेल्या शेतकºयांची नावे वगळण्यात आल्याने अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशैलीविरूद्ध गावकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने चौकशी करून खºया पूरग्रस्त लाभार्थ्यांना भरपाई द्यावी व चुकीचे सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे.