खेड्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास - कुलगुरू डॉ. शरद गडाख
By राजेश मडावी | Published: June 19, 2023 04:30 PM2023-06-19T16:30:42+5:302023-06-19T16:31:16+5:30
कृषी विज्ञान केंद्रातर्फे नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद
चंद्रपूर : शेतकऱ्यांचा विकास झाला, तर खेड्यांचा विकास होईल व खेड्यांचा विकास झाला तरी देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. शनिवारी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाहीतर्फे आदर्श गाव नाचनभट्टी येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रमुख उपस्थिती नाचणभट्टीच्या सरपंच विद्या खोब्रागडे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, डॉ. विनोद नागदेवते, मच्छिंद्र रामटेके, डॉ. जी. आर. शामकुवर, डॉ. व्ही. एन. सिडाम, डॉ. एस. एन. लोखंडे, डॉ. व्ही. वाय, जगदाळे, कु. एस. आर. वेलादी, संजय कोसुरकर उपस्थित होते.
नाचनभट्टी येथील कृषी व कृषी संलग्न परिस्थितीचा अहवाल सादर केला. डॉ. उंदिरवाडे यांनी विद्यापीठ अकोलाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या तीन उपक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. मच्छिंद्र रामटेके यांनी आदर्श गाव योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रीती हिरळकर यांनी आत्मा कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. व्ही. जी. नागदेवते, संचालन डॉ. व्ही. एन. सिडाम यांनी केले, डॉ. एस. एन. लोखंडे यांनी आभार मानले.