रिपब्लिकन विचारधाराच भारताला राजकीय दृष्टीने सक्षम करू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:02+5:302021-05-15T04:27:02+5:30

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक निमगडे उपस्थित होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे तत्त्व व विचारधारा भारतीय लोकांसाठी मानवी कल्याणाचा ...

Only Republican ideology can make India politically capable | रिपब्लिकन विचारधाराच भारताला राजकीय दृष्टीने सक्षम करू शकते

रिपब्लिकन विचारधाराच भारताला राजकीय दृष्टीने सक्षम करू शकते

Next

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक निमगडे उपस्थित होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे तत्त्व व विचारधारा भारतीय लोकांसाठी मानवी कल्याणाचा मार्ग असल्याने त्यांना जनमानसात रुजवणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुंबईतील सुनील खोब्रागडे यांनी मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रात रिपब्लिकन संकल्पना राजकीयदृष्टीने मांडली, तर यश नक्की प्राप्त होईल, असा आशावाद व्यक्त केला. सोलापूर येथून डी.के. साखरे यांनी रिपब्लिकन पक्षाचे संगठन मजबूत करण्याकरिता कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फुले- शाहू- आंबेडकर यांच्या प्रेरणेने राजकीय प्रवास केला, तर भारतीय राजकारण नक्कीच संविधानावर आधारित वाटचाल करेल, असे मत व्यक्त केले. चर्चासत्रात नागपूर येथील हेमराज चिंचखेडे, इ.मो. नारनवरे, घनश्याम फुसे, रोहिदास राऊत, संजय बोरकर गडचिरोली, सामाजिक कार्यकर्ता बंडू रामटेके, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव टी.डी. कोसे, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजकुमार जवादे, चंद्रपूरचे विशालचंद्र अलोणे, प्रतीक डोर्लीकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Only Republican ideology can make India politically capable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.