शिक्षणामुळेच प्रगती शक्य - माळी

By admin | Published: August 19, 2014 11:37 PM2014-08-19T23:37:41+5:302014-08-19T23:37:41+5:30

प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळणे हा आपल्या देशात कायदा असून शिक्षणामुळेच आपली व देशाची प्रगती शक्य असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी व्यक्त केले.

Only through education can progress - Mali | शिक्षणामुळेच प्रगती शक्य - माळी

शिक्षणामुळेच प्रगती शक्य - माळी

Next

बक्षीस वितरण : विधी सेवा प्राधिकरणाचे आयोजन
चंद्रपूर : प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळणे हा आपल्या देशात कायदा असून शिक्षणामुळेच आपली व देशाची प्रगती शक्य असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मातोश्री महाविद्यालय चंद्रपूर येथे झालेल्या या कार्यक्रमास प्राधिकरणाचे सचिव रवींद्र हिवसे, संस्थेच अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र खनके, सचिव रविकांत खनके, सर्व न्यायधीश व विद्यार्थी उपस्थित होते. ही स्पर्धा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने घेण्यात आली. २९ महाविद्यालयातील ६६९ विद्यार्थ्यांचे निबंध प्राधिकरणास प्राप्त झाले. यातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
महाविद्यालयीन विजेत्यामधील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक श्वेता गजानन डाहुले, द्वितीय नेहा शेषराव तामगाडगे आणि तृतीय क्रमांक सिद्धार्थ सुरेश करमरकर यांचा आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक फिजा सत्तार कुरेशी, द्वितीय चारू अविनाश थेरे आणि तृतीय क्रमांक सुरभी अभिमन्यु ठाकुर यांचा आला. इतर विजेत्या विद्यार्थ्यांना भाग्यश्री चंद्रभान तडस, मंजला गोविंदराव चंचल, निकीता करबडे, सिमरण खांडेलकर, वैभवी घरोटे, मयुरी श्रीरामे, अंश अरुण उराडे, नेहा मेश्राम तर विद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्राची जुलमे, श्रद्धा गावंडे, नुजल फातीमा सलीमउद्दीन, पूजा सिंग, मयूर मडावी, वैष्णवी चौधरी, देवाशिष सोनुले, शरयू बडे, श्वेता रामटेके, नजीया शेख, अवदेश राजभर, पूनम झिंगरे, श्रद्धा अवताडे, ऋतुजा घडुले आणि यशोदीप मेश्राम यांचा समावेश आहे. प्रकाश माळी पुढे म्हणाले, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण लोकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचविण्याचे काम करते. या प्राधिकरणामार्फत शिबिरे आणि अदालत घेण्यात येतात. या कार्यक्रमात रवींद्र हिवशे, अ‍ॅड. रवींद्र खनके व पाहुण्यांची भाषणे झाली.
शेवटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक उत्कृष्ट नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या प्राचार्या इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बंडू बिजवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, विद्यालयाचे धर्मपुरीवार, अनिता उमाळे, विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Only through education can progress - Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.