ई-पाससाठी दोनच कारणे, रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:52+5:302021-05-04T04:11:52+5:30
बॉक्स ही कागदपत्रे हवीत ई-पाससाठी पोलीस संकेतस्थळावर दररोज मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र बहुतांशी अर्जदार केवळ माहिती ...
बॉक्स
ही कागदपत्रे हवीत
ई-पाससाठी पोलीस संकेतस्थळावर दररोज मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत आहेत. मात्र बहुतांशी अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे, हे नमूद करत नाहीत. त्यामुळे अशा पासला मंजुरी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करताना अर्जदाराचा फोटो, सहप्रवाशाची माहिती, ज्या कारणासाठी प्रवास करीत आहेत, त्या कामाची आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे. अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर तसा संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येतो.
बॉक्स
असा करा अर्ज
सर्वात प्रथम एचटीटीपी स्लॅश कोविड डॉट एमएचपोलीस डॉट इन या बेबसाइटवर जाऊन स्वत:ची माहिती, फोटो व ज्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जायचे आहे, त्या कारणाशी संबंधित असलेली कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारासह एक सांकेतिक क्रमांक मिळतो. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाइटवर टाकल्यास हा ई-पास थेट डाउनलोड करून घेता येईल.
बॉक्स
एक तासात मिळतो पास
नागरिकांना ई-पास देण्याची जबाबदारी सायबर पोलिसांकडे देण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी अर्जाची तपासणी करून नागरिकांना पास देत आहेत. सर्व कागदपत्रे जोडले असतील तसेच आवश्यक काम असेल तर त्याला एका तासात ई-पास देण्यात येतो. सर्वसाधारण कारण असेल तर त्याचा अर्ज नामंजूर करण्यात येतो.