खासदार चषक विदर्भस्तरीय पुरूष कबड्डी सामन्यांचे उद्घाटन
By admin | Published: November 29, 2015 02:01 AM2015-11-29T02:01:24+5:302015-11-29T02:01:24+5:30
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर ....
चंद्रपूर : केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या संयोजकत्वात तसेच सन्मित्र मंडळ चंद्रपूर व सत्शील बहुउद्देशीय मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ ‘खासदार चषक २०१५’ ६५ किलो वजन गट विदर्भस्तरीय (पुरूष) तीन दिवसीय भव्य कबड्डी सामन्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सामन्याचे विधीवत उद्घाटन दीप प्रज्वलनाने मान्यवर अतिथींच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. नाना शामकुळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव अंदनकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, उपमहापौर वसंत देशमुख, भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेश मून, वासुदेवराव कोतपल्लीवार, भाजपा मनपा गटनेते अनिल फुलजेले, झोन सभापती अंजली घोटेकर, अनिल शिंदे, चंद्रपूर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अशोक मोरे, सचिव दिलीप रामेडवार, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक रामू तिवारी, धनंजय हूड, राजेंद्र अडपेवार, मोहन चौधरी, राजू खांडेकर, रघूवीर अहीर, वनश्री गेडाम, विलास जागेकर आदी प्रभृतींची उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. मंडळाच्या माध्यमातून अतिथींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. नाना शामकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या क्रीडा विषयक भूमिकेची प्रशंसा केली. त्यांनी अगदी सुरूवातीपासूनच विविध क्रीडा प्रकारांना चालना देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे असे सांगत आजही राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना क्रीडा वाढीला प्रोतसाहन देत विविध प्रकारच्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी सदोदित चालविला आहे. आयोजकांनीमंडळांनी अतिशय परिश्रमातून हे आयोजन करून विदर्भस्तरीय कबड्डी सामने आयोजित करून शहरी व ग्रामीण भागातील क्रीडा पटूंना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना यशाच्या शुभेच्छा दिल्या.
महापौर राखी कंचर्लावार यांनी या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून अशा सामन्यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होतो व या संधीचे सोने करून अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरापर्यंत मजल मारतात असे सांगितले. या खेळाडूंमधूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कबड्डी स्पर्धक निपजतील अशा शुभेच्छा देऊन जानेवारी २०१६ मध्ये खासदार चषकच्या धर्तीवर महापौर चषक कबड्डी सामने आयोजित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रमोद कडू, राजेश मून यांची समयोचित भाषणे झाली.
उद्घाटनपर कार्यक्रमात एकूण आठ सामने घेण्यात आले. यात सन्मित्र क्रीडा मंडळ चंद्रपूर विरूद्ध इंदिरा क्रीडा मंडळ बल्लारपूर यांच्यात अटीतटीचा सामना होवून सन्मित्र क्रीडा मंडळाने बाजी मारली तर जयश्रीराम क्रीडा आखाडा बल्लारपूर व पुलगाव क्रीडा मंडळ यांच्यात झालेल्या सामन्यात बल्लारपूरची चमू विजयी घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद काळे, संचालन मोरे यांनी तर आभार मनोज पुलगमकर यांनी मानले. या कबड्डी सामन्यामध्ये नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यातील विविध मंडळाचे खेळाडू सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता धनंजय हुड, विनोद शेरकी, अमित लडके, रवींद्र शेरकी, किशोर कुडे, मनोज शेरकी, भाजर रोहणे, सचिन ठाकरे, प्रमोद डाखोरे, महेंद्र व्याहाडकर, संभा खेवले, संतोष दंडेवार, प्रमोद डंभारे, समिर चाफले, श्याम चाफले व मंडळाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)