पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:50+5:302021-05-03T04:22:50+5:30

फोटो बल्लारपूर : मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक प्रभावशाली असून, मोठ्या ...

Operate Covid Care Center at full capacity | पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा

पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा

Next

फोटो

बल्लारपूर : मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक प्रभावशाली असून, मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे. बल्लारपूर तालुक्यात ५१० बेड्सचे नियोजन असून, त्यातील काहीच केंद्र कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत पूर्ण क्षमतेने कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

खासदार धानोरकर यांनी या केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, तहसीलदार राईंचवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, मुख्याधिकारी नगरपरिषद सरनाईक, काँग्रेस नेते घनशाम मुलचंदानी, करीमभाई, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्या, जयफराज बजगोती, डॉ. भसारकर, इस्मानभाई, मो. फारूक यांची उपस्थिती होती.

यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी समाजकल्याण विभागाचे मुलीचे व मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. यामध्ये २ जनरेटर, ५ व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रुग्णवाहिका ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यामध्ये समाजकल्याण विभाग मुलींचे वसतिगृह येथे ६० बेड कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासोबतच मुलांचे वसतिगृह येथे १२० बेड्स, बल्लारपूर स्टेडियम परिसरात स्पोर्ट हॉल येथे ४० बेड्स, पॅव्हेलियम बिल्डिंग येथे ४० बेड्स, बॅडमिंटन हॉल येथे ७० बेड्स, कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच मानोरा आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी ८० अशी व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, यातील काहीच सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण केंद्र संपूर्ण क्षमतेने १० दिवसांत कार्यान्वित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Web Title: Operate Covid Care Center at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.