धक्कादायक! चंद्रपुरात नेत्रचिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 10:47 PM2023-07-11T22:47:21+5:302023-07-11T22:48:12+5:30
Chandrapur News नेत्र चिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल (४८) यांनी स्वतःचे राहते घरी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर : नेत्र चिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल (४८) यांनी स्वतःचे राहते घरी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आझाद बगीचापासून काही अंतर दूर मुख्य मार्गावर चर्चचे अगदी समोर डॉ. उमेश अग्रवाल यांचे हॉस्पिटल आहे. त्याच हॉस्पिटलचेवर त्यांचे घर देखील आहे. सायंकाळी आठ वाजताचे सुमारास हॉस्पिटलमध्ये रुग्ण आला म्हणून परिचर त्यांना बोलावण्यासाठी घरी गेला होता. यावेळी डॉ. अग्रवाल त्यांचे बेडरूममध्ये पलंगावर झोपलेल्या अवस्थेत होते. यावेळी परिचराने डॉ.अग्रवाल यांना आवाज दिला. परंतु ते उठले नाही. यावेळी त्यांचा जवळ जावून बघितले आता त्यांचा श्वास बंद झाला होता. घाबरलेल्या परिचराने आरडाओरड केली. समोरच डॉ. शिरीष चौधरी यांचे हॉस्पिटल आहे. त्यांना बोलावण्यात आले. यावेळी डॉ. चोधरी यांनी तपासले असता डॉ. अग्रवाल मरण पावले असे सांगितले.
त्यानंतर जवळच राहत असलेले हृदयरोग चिकित्सक डॉ. झाडे यांनाही बोलाविले असता त्यांनी डॉ. अग्रवाल यांना मृत घोषित केले. डॉ. अग्रवाल यांचे बेडशेजारी इंजेक्शन पडून होते. ते इंजेक्शन घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. अग्रवाल मानसिक आजारातून जात होते अशी माहिती आहे. ते येथील मानसोपचार तज्ञ डॉ. इम्रान अली शिवजी यांच्याकडे उपचार घेत होते अशीही माहिती आहे. डॉ. अग्रवाल यांच्या मागे डॉक्टर पत्नी व डॉक्टर मुलगा आहे. हे दोघेही डॉ. अग्रवाल यांनी आत्महत्या केली तेव्हा नागपुरात होते अशी माहिती अहे.