विरोधक जनतेची दिशाभूूल करतात

By admin | Published: July 27, 2016 01:18 AM2016-07-27T01:18:51+5:302016-07-27T01:18:51+5:30

चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही दिवसांपासून डी.व्ही.डी. एफ फंडातील ९३ लाखांच्या निधी बाबत आणि अगदी कमी कालावधीमध्ये केलेल्या विकास कामाबद्दल...

Opponents guide the people | विरोधक जनतेची दिशाभूूल करतात

विरोधक जनतेची दिशाभूूल करतात

Next

नेरी: चिमूर तालुक्यातील नेरी ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही दिवसांपासून डी.व्ही.डी. एफ फंडातील ९३ लाखांच्या निधी बाबत आणि अगदी कमी कालावधीमध्ये केलेल्या विकास कामाबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे कुटील कारस्थान सर्रास विरोधक करीत आहेत. विरोधकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे ग्रामवासियांची दिशाभूल होत आहे, असा आरोप सरपंच रामदास सहारे यांनी केला आहे.
मागील १० वर्षांपासून विद्यमान विरोधकांची सत्ता होती. या कालावधीमध्ये त्यांनी गावाचा विकास साधला नाही. त्या काळात नेरी गावातील मोक्याच्या सर्व जागांवर अतिक्रमण करण्यात आले. आता मंगल कार्यालय व दुकान गाळे बांधकाम करण्याकरिता जागा शिल्लक राहिलेली आहे. त्याच्या कामाची पावती म्हणून जनतेने काँग्रेस विचारसरणीच्या प्रगती ग्रामविकास आघाडीला भरघोस मतानी निवडून दिले. एक वर्षाचा कालावधीत नेरी ग्रामपंचायतही विकासाचा महामेरु ठरत आहे. त्यामुळे विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूरचा जिल्हा ग्रामविकास निधीअंतर्गत ग्रामपंचायतीना कर्ज स्वरूपात निधी वितरण करण्याचा लोकाभिमुख निर्णय १५ वर्षांत प्रथमच तत्कालीन कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानुसार १२ कोटी ४३ लाख १२ हजार रुपयाचा निधी जिल्हा परिषदेने उपलब्ध केला. हा निधी ०.२५ टक्के व्याजाने अंशदान जिल्हा ग्रामविकास निधी जिल्हास्तरावरील खात्यात जमा करावा लागते. याप्रमाणे नेरी ग्रामपंचायतीने या निधीची मागणी केली असता ९३ लाख रुपये उपलब्ध झाले. या निधीसाठी विरोधकाची संमती घेऊन प्रस्तावावर ठराव घेतला.
या निधीचा उपयोग हा गावाचा विकास करण्यासाठी मंगल कार्यालय,दुकान गाळे बांधकामासाठी करण्यात येणार आहे. असेही सदर बांधकामातून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. दर वर्षाला १५ गाळ्यामधून एक महिना ६०० रुपये याप्रमाणे एक लाख आठ हजार रुपये व मंगल कार्यालयाचे उत्पन्न पाच लाख, याप्रमाणे होऊन कर्जफेड होणार आहे. तसेच जे लिलाव होईल, त्याचे अंदाजे दोन लाखाप्रमाणे ३० लाख रुपये येतील. १० वर्षामध्ये कर्जफेड होईल. सदर निधी प्रकरणाबद्दल स्थानिक जिल्हा परिषद सदस्या म्हणतात की, मला याबाबतीतील कुठलीही कल्पना नाही. याचाच अर्थ असा की, या सदस्या आपल्या कामात किती तत्पर असतील? कारण हा जिल्हा परिषदेचा निधी आहे. त्यावरुन हे स्पष्ट होते की, विकास करायचा नाही आणि दुसऱ्याला करु द्यायचा नाही.
सदर बाबीकडे विरोधक म्हणतात की, हा निधी घेवू नये अन्य निधी घ्यावा. परंतु त्यांना हे माहिती नाही की, कोणता निधी कोणत्या कामाल मिळातो. तसेच मागील पंचवार्षिक मध्ये विरोधकाची सत्ता होती तेव्हा खासदार निधीमधून १० लाखांचा निधी पार्वती मंदिर सभागृह बांधकामासाठी आला होता. पण विरोधकांनी नाहरकत न दिल्यामुळे तो परत गेला. तसेच मॉडेल ग्रामपंचायतीसाठी चार लाखांचा निधी मंजूर झाला असताना आमची सत्ता नाही म्हणून इतरत्र कळविला होता. तसा पत्रव्यवहार केला होता. परंतु आम्ही प्रयत्न करुन तो परत मिळविला, असा दावाही सहारे यांनी केला आहे.
सहारे म्हणाले की, ग्रामस्वच्छतेला अधिक महत्त्व देवून गावातील केरकचरा फेकण्यासाठी ट्रक्टर उपलब्ध केले आहे. तसेच मटन मार्केट हटवून तेथील दुर्गंधी दूर केली आहे. नाली बांधकाम व उपसा करण्याचे कार्य केले आहे. यावर विरोधक उलट्या टिपण्या करतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या स्वच्छता मोहिमेचा विसर पडला आहे. पिण्याच्या पाण्याच्याटाकीतील गाळ उपसा करुन याच काळात टँकरने पाणी विहिरीत टाकून लोकांना पुरविले. दूषित पाण्यावर आळा घालण्यासाठी दोन रुपयांमध्ये २० लीटर शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे विरोधकाच्या पोटात दुखत आहे. असा आरोपही सहारे यांनी केला आहे. या पत्रपरिषदेला उपसरपंच वंदना दडमल, सदस्या भावना पिसे, इंदिरा कामडी, रंजना वैरागडे, कंदा पिसे, सचिन पिसे, सदाशिव बोरकर, छबू चौधरी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Opponents guide the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.