वेकोलितील डम्पर आॅपरेटरच्या बदलीला इंटक युनियनचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:01 PM2018-10-28T23:01:05+5:302018-10-28T23:01:27+5:30
वेकोलि माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ क्षेत्रात बदली करण्यात आली आहे. या बदलीचा इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन उभारू, अशा आशयाचे निवेदन वेकोलि प्रबंधकाला दिल्याचे आयोजित पत्रपरिषदेत माजरी वेकोलि इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : वेकोलि माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ क्षेत्रात बदली करण्यात आली आहे. या बदलीचा इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. या बदल्या रद्द न झाल्यास आंदोलन उभारू, अशा आशयाचे निवेदन वेकोलि प्रबंधकाला दिल्याचे आयोजित पत्रपरिषदेत माजरी वेकोलि इंटकचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी सांगितले.
यापूर्वी या क्षेत्रातील इतरत्र केल्या गेलल्या कामगारांच्या बदलीविरोधात खाणीतील कार्यरत पाचही कामगार संघटनांनी वेकोलि महाप्रबंधकास पत्र देवून स्थानांतर करू नये, अशी मागणी केली होती. यावर माजरी क्षेत्राच्या क्षेत्रीय महाप्रबंधकांनी १३ मे २०१८ ला इंटक युनियटच्या अध्यक्षाला पत्र देवून या क्षेत्रातीलच अन्य कोळसा खाणीत त्यांचे स्थानांतर करू, असे लिखीत दिले.
परंतु त्यांनी आपल्या दिलेल्या पत्रास केराची टोपली दाखवून माजरी क्षेत्रातील १० डम्पर आॅपरेटरांची वणी नॉर्थ येथे १९ आॅक्टोंबरला बदली केली आणि या सर्वांना २० आॅक्टोंबरला भारमुक्त केले. यापूर्वी युनियनच्या पदाधिकाºयांनी ७ आॅक्टोंबरला महाप्रबंधकासोबत स्थानिक कामगारांच्या स्थानांतर न करण्याबाबत चर्चा केली असता आपणावर जी. एम. आय. नागपूर यांचा दबाव असल्याचे सांगितले. बदली झालेल्या १० आॅपरेटरांचे सहा महिन्यांपूर्वी दुसºया कोळसा खाणीतून येथे स्थानांतर झाले होते, हे विशेष.
या संदर्भात दहाही कामगारांनी आपल्या न्यायीक मागणीसाठी २१ आॅक्टोबरला महाप्रबंधकास पत्र देवून आत्मदहन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. वेकोलिच्या नागपूर विभागात १० वेकोलिचे क्षेत्र आहे. प्रत्येक ठिकाणी ७०० ते १००० पर्यंत अतिरिक्त कामगार कार्यरत आहेत. या ठिकाणी ६३ कामगार अतिरिक्त असतांनासुद्धा येथीलच कामगारांचे स्थानांतर का केले जाते, असा प्रश्न इंटक नेते धनंजय गुंडावार यांनी यावेळी केला.
इंटकचे जनरल सेक्रेटरी एस. क्यू. जमा यांनी नागपूर येथील सीएमडी यांना १३ आॅक्टोबरला पत्र देवून बदली रद्द करण्याचे सांगितले. तसेच २६ आॅक्टोबरला नागपूर - वर्धा रिझन कमिटी इंटकचे महामंत्री के. के. सिंग यांनी माजरी येथे येवून अधिकाºयांशी चर्चा केली.
जोपर्यंत या १० कामगारांचे स्थानांतर रद्द करून त्यांना याच ठिकाणी कार्यरत करीत नाहीश तोपर्यंत इंटक युनियन शांत बसणार नाही, असा इशारा इंटक अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी दिला. यावेळी माजरी क्षेत्राचे कार्याध्यक्ष संजय दुबे, कामगार राजू बोबडे, दत्तू सैताने, सुधाकर बेलखडे यांच्यासह कामगार उपस्थित होते.