शहरातील रस्ते डागडुजीसाठी मनपासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:50 PM2018-12-26T22:50:58+5:302018-12-26T22:51:41+5:30

अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. परंतु, या रस्त्यांची डागडुजी न केल्याने बुधवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आले. आठ दिवसाच्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तर कंत्राटदरांच्या जेसीबी मशिन फोडण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.

Opposition demonstrations for road repair in the city | शहरातील रस्ते डागडुजीसाठी मनपासमोर निदर्शने

शहरातील रस्ते डागडुजीसाठी मनपासमोर निदर्शने

Next
ठळक मुद्देशेकडो नागरिक सहभागी : अन्यथा जेसीबी फोडण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. परंतु, या रस्त्यांची डागडुजी न केल्याने बुधवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आले. आठ दिवसाच्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तर कंत्राटदरांच्या जेसीबी मशिन फोडण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.
शहरात अमृत कलश योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी २३५ कोटी रूपये खर्च केल्या जाणार आहे. इतक्या मोठ्या कामाचे कंत्राट अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराविरूद्ध अनेक तक्रारी असून कारवाईकरण्यात आलेली नाही. उलट पाठराखण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांना केला. ठेकेदाराला बांधकामाचा अनुभव नसल्याने अमृत कलश योजनेमुळे शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरण झाले. या रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खोदकामामुळे सौंदर्यीकरणावर पाणी फेरले. खोदलेल्या रस्त्यांची डागडुजी केल्यानंतरच पूढील खोदकाम आठ दिवसांत पूर्ण करा अन्यथा कंत्राटदाराच्या जेसीबी फोडून काम बंद पाडू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक विशाल निंबाळकर, विशाल मत्ते, इरफान शेख, विनोद अनंतवार, कलाकार मल्लारप, टिकाराम गावंडे, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, दुर्गा वैरागडे, माला पेंदाम, माला तुरारे, रजनी चिंचोळकर, सुजाता बल्ली, शांता धांडे, मुन्ना जोगी, हर्षद कानमपल्लीवार, कालिदास धामनगे, कैलास धायगुडे, राशीद हुसैन, सुरज चव्हाण उपस्थित होते.
रस्त्यांची दुरूस्ती तातडीने पूर्ण करणार
पाईपलाईन टाकताना कोणतेही नियोजन केले नाही. संबंधित कंत्राटदाराला मोठ्या योजना पूर्ण करण्याचा अनुभव नाही. याचे परिणाम शहरातील नागरिक भोगत आहेत. शहरातील सर्वच रस्ते खराब झाले. नागरिकांना वाहनातून स्वतच्या घरापर्यंत जाणे कठीण झाले. अनेक अपघात होत आहेत, अशी नाराजी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

Web Title: Opposition demonstrations for road repair in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.