चिटफंड कंपन्यांच्या विरोधात चंद्रपुरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:24 PM2018-02-23T23:24:56+5:302018-02-23T23:25:13+5:30
विदर्भात साईप्रकाश, मैत्रेय, समृद्धी जीवन, सुखकर्ता, रोजव्हेली अशा अनेक चिटफंड कंपन्यांनी आपली दुकानदारी सुरू करून गुंतवणुकदारांना गंडविले आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विदर्भात साईप्रकाश, मैत्रेय, समृद्धी जीवन, सुखकर्ता, रोजव्हेली अशा अनेक चिटफंड कंपन्यांनी आपली दुकानदारी सुरू करून गुंतवणुकदारांना गंडविले आहे. या चिटफंड कंपन्यांच्या संचालकांवर कारवाई करून गुंतवणुकदारांची रक्कम परत करावी, फसवणूक करणाºया चिटफंड कंपनीच्या संचालकांना अटक करावी आदी मागण्यांसाठी जनसहयोग संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
गांधी चौक येथून मोर्चाला सुरूवात झाली. या मोर्चात जिल्हाभरातून शेकडो महिला व पुरुष गुंतवणूकदार सहभागी झाले होते. चिटफंड कंपन्यांच्या विरोधात घोषणात देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट देवून निवेदन दिले.
यात अभिकर्त्यांवर लावण्यात आलेले गुन्हे खारीज करण्यात यावे, पीडित अभिकर्त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, यानंतर कोणत्याही अभिकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये अशी मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी जनसहयोगचे जिल्हाध्यक्ष अरविंद उराडे, धीरज बांबोडे, विलास उंदिरवाडे, गणेश भांडेकर, संजय हांडेकर, नारायण गांगुली आदींची उपस्थिती होती.