मनपाच्या प्रशासनाची विरोधकांना साथ

By admin | Published: May 31, 2016 01:10 AM2016-05-31T01:10:39+5:302016-05-31T01:10:39+5:30

महानगर पालिकेतील प्रशासन सत्तेसोबत नसून केवळ विरोधकांची पाठराखण करण्यात गुंतले आहे. विरोधकांना विकास

Opposition to the Opposition of NMC administration | मनपाच्या प्रशासनाची विरोधकांना साथ

मनपाच्या प्रशासनाची विरोधकांना साथ

Next

चंद्रपूर : महानगर पालिकेतील प्रशासन सत्तेसोबत नसून केवळ विरोधकांची पाठराखण करण्यात गुंतले आहे. विरोधकांना विकास कामात कसलीही रूची नाही. दुर्देवाने प्रशासनाचीही विरोधकांना साथ असल्याने अनेक विकासकामे खोळंबून पडली आहेत, असा आरोप महापौर राखी कंचार्लावार यांनी सोमवारी सायंकाळी मनपाच्या आमसभेनंतर घेतलेल्या पत्रकावर परिषदेत केला.
विरोधकांवर तोंडसुख घेताना महापौर कंचर्लावार म्हणाल्या, विरोधी पक्षाला विकासकामांमध्ये रूची नाही. प्रत्येक बाबतीत विरोध करण्याचे धोरण सुरू आहे. आयुक्तांची भूमिका विकासासाठी पुरक हवी. मात्र ते सुद्धा त्यांच्या बाजुने असल्याने अडथळा सुरू आहे.
आजच्या आमसभेत स्थायी समिती सभापती या नात्याने संतोष लहामगे यांनी डायसवर बसणे शिरस्त्याचे होते. मात्र त्यांनी सर्वसामान्य नगरसेवकांमध्ये बसणे पसंत केले. यासंदर्भात लहामगे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले,
सभापती आणि स्थायी समितीचे आयुक्तांना महत्व नाही, त्यामुळे डायसवर बसण्यात अर्थ काय. मागील नऊ महिन्यांपासून आयुक्त स्थायी समितीच्या सभेत आले नाही. स्वत:एवेजी उपायुक्तांना पाठवितात. उपायुक्तांना महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे कोणत्याही ठरावावर निर्णय होऊ शकले नाही. मागील दोन वर्षांपासून त्यांची ही असहकाराची भूमिका सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. महाकाली यात्रेतील भाविकांच्या सुविधेसाठी १९ सफाई कामगारांची निविदा काढणे आवश्यक होते.
मात्र आयुक्त सभेला नसल्याने निविदेवर निर्णय होऊ शकला नाही. परिणामत: यात्रेत कामगार वाढविता आले नाही, याकडे रामू तिवारी यांनी लक्ष वेधले. आमसभेमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Opposition to the Opposition of NMC administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.