राहुल गांधींवरील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:14 AM2017-08-06T00:14:06+5:302017-08-06T00:14:31+5:30
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील पुरग्रस्तांची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या वाहनावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून जिवितहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे गुजरात बनासकांठा जिल्ह्यातील पुरग्रस्तांची भेट घेऊन परत येत असताना त्यांच्या वाहनावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून जिवितहानी करण्याचा प्रयत्न केला आहे. झेड प्लस सुरक्षा असताना गुजरात सरकारच्या निष्क्रीयपणामुळे राहुल गांधी थोडक्यात बचावले. या घटनेच्या निषेधार्थ गांधी चौकात माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. तर चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाºयांनी शनिवारी सकाळी ११ वाजता जटपुरा गेटवर निदर्शने करून घटनेचा निषेध केला.
याप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणानून सोडला. याप्रसंगी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, महाराष्टÑ प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, माजी प्रदेश सचिव सुनिता लोढिया, डॉ. रजनी हजारे, संजय रत्नपारखी, डॉ. विजय देवतळे, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष अॅड. मलक शाकीर, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, अनिल सुरपाम, महेश मेंढे, लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, दिनेश चोखारे, बंडोपंत तातावार, कुणाल चहारे, फारूक सिध्दीकी, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महिला शहर अध्यक्ष अनिता कथडे, अमजत अली, रवी अल्लेवार, सचिन कत्याल, रुचित दवे, कुणाल चहारे, कादर राहील शेख, गौतम चिकाटे, मोहर डोंगरे आदी उपस्थित होते.