घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:31 PM2018-03-08T23:31:00+5:302018-03-08T23:31:00+5:30

बायपास मार्गावरील कम्पोस्ट डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याकरिता आलेली निविदा मंजूर करण्याला स्थायी समितीच्या सभेत कडाडून विरोध करण्यात आला.

Opposition to the solid waste management project | घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला कडाडून विरोध

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला कडाडून विरोध

Next
ठळक मुद्देस्थायी समितीची सभा : वाढीव विकास आराखड्याला स्थगिती

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : बायपास मार्गावरील कम्पोस्ट डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्याकरिता आलेली निविदा मंजूर करण्याला स्थायी समितीच्या सभेत कडाडून विरोध करण्यात आला. त्यानंतर वाढीव शहर विकास आराखड्याबाबतही सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे हा विषयही स्थगित करण्यात आला.
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी आयोजित करण्यात आली. सभापती राहुल पावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत दोन विषयावरून चांगलाच गदारोळ झाला. सभा सुरू होताच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी कंत्राट देण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. येथील बायपास मार्गावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करण्यासाठी मनपाने निविदा काढल्या होत्या. हैदराबाद येथील एका कंपनीने निविदा भरली होती. या कंपनीला कंत्राट द्यावे काय, याबाबत सभेत चर्चा झाली.
मात्र याला समितीच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला. ८०० रुपये प्रति टन याप्रमाणे ही कंत्राटी कंपनी घनकचºयावर प्रक्रिया करून खत वा इतर वस्तू तयार करणार आहे. मात्र ८०० रुपये प्रति टन म्हणजे नागरिकांच्या पैशाची लूट असल्याचे सदस्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी २५० ते २८० रुपये प्रति टन, याप्रमाणे कंत्राटी कंपन्या कम्पोस्ट डेपोवर खत निर्मिती प्रकल्प राबवित आहेत. ते यात यशस्वीही झाले आहेत.
हैदराबाद येथील कंपनीला प्रति टन कचºयाचे ८०० रुपये देणे हा पैशाचा अपव्यय आहे. त्यामुळे हे कंत्राट मंजूर करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर या विषयाला स्थगिती देण्यात आली.
दरम्यान, वाढीव शहर विकास आराखडा तयार करण्याचा विषयही चर्चेसाठी ठेवण्यात आला. या आराखड्यासाठी दोन कोटी ९७ लाख ९७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र या विषयालाही सदस्यांनी विरोध दर्शविला. अद्याप महापालिका हद्दीत वाढीव क्षेत्र समाविष्ट झालेले नाही. प्रस्तावित गावांच्या ग्रामसभांना मनपा हद्दीत समाविष्ट होण्यास नकार दर्शविला आहे. असे असताना आताच आराखडा तयार करणे व निधी खर्च करणे उपयुक्त नाही, असे सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे या विषयालाही स्थगिती देण्यात आली.
आठ सदस्य निवृत्त
मनपाच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यापैकी आठ सदस्यांची मुदत संपल्याने त्यांना या सभेत ईश्वर चिठ्ठीद्वारे निवृत्त करण्यात आले. यात विद्यमान सभापती राहुल पावडे यांच्यासह वंदना जांभुळकर, सचिन भोयर, राजेंद्र अडपेवार, सोपान वायकर, ज्योती गेडाम, छबू वैरागडे आणि अशोक नागापुरे यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या जागेवर दुसºया आठ सदस्यांची निवड १ एप्रिलनंतर होणाºया आमसभेत केली जाणार आहे. जोपर्यंत सभापती पदाची निवडणूक होणार नाही, तोपर्यंत राहुल पावडे हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतील.

Web Title: Opposition to the solid waste management project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.