पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश! LCB चे महेश कोंडावार EOW ला, काचोरे यांचीही बदली

By परिमल डोहणे | Updated: February 22, 2025 00:01 IST2025-02-22T00:01:02+5:302025-02-22T00:01:34+5:30

भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्षभरात चौथ्यांदा बदली

Orders for transfer of Superintendents of Police LCB Mahesh Kondawar to EOW Amol Kachore also transferred | पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश! LCB चे महेश कोंडावार EOW ला, काचोरे यांचीही बदली

पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश! LCB चे महेश कोंडावार EOW ला, काचोरे यांचीही बदली

परिमल डोहणे, चंद्रपूर: मागील बऱ्याच दिवसापासून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे वारे सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखा तर त्यांच्या जागी भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात काचोरे यांची चौथ्यांदा बदली झाली आहे. दुर्गापूर येथील पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांची भद्रावती येथे तर प्रभारी पोलिस उपाधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची दुर्गापुर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. 

एलसीबीसाठी अनेकांनी लावली होती फिल्डिंग

एलसीबीचे ठाणेदार महेश कोंडावार यांचा कार्यकाळ पूर्ण होताच एलसीबीसाठी अनेक ठाणेदारांना डोहाळे लागले होते. जिल्ह्यातील बहुतांश ठाणेदारांनी तर एलसीबीसाठी फिल्डिंगही लावली होती. जिल्ह्यातील चार ते पाच ठाणेदारांची नावे एलसीबीसाठी चर्चेत असतानाच शुक्रवारी भद्रावतीचे ठाणेदार अमोल काचोरे यांच्या नावावर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी शिक्कामोर्तब करून बदलीचे आदेश जाहीर केले.

Web Title: Orders for transfer of Superintendents of Police LCB Mahesh Kondawar to EOW Amol Kachore also transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.