‘त्या’ अध्यादेशाने भावी शिक्षकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:26 PM2018-09-18T22:26:50+5:302018-09-18T22:28:26+5:30

खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेमध्ये करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नव्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहे. मात्र यामुळे शिक्षक भरतीवर परिणाम होणार असल्याने या अध्यादेशामुळे भावी शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे.

The 'Ordinance' appeals to prospective teachers | ‘त्या’ अध्यादेशाने भावी शिक्षकांमध्ये नाराजी

‘त्या’ अध्यादेशाने भावी शिक्षकांमध्ये नाराजी

Next
ठळक मुद्देअध्यादेश रद्द करावा : शिक्षणधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेमध्ये करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नव्या अध्यादेशानुसार देण्यात आले आहे. मात्र यामुळे शिक्षक भरतीवर परिणाम होणार असल्याने या अध्यादेशामुळे भावी शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे तो अद्यादेश रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन डी.टी.एड, बी.एड. स्टूडंट असोसिएशनच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
मागील सात वर्षांपासून शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळे लाखो डीटीएड बीएड पदविकाधारकाची फौज तयार झाली. त्यातच शासनाने २० जून २०१८ च्या शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यामुळे डीटीएड व बीएड धारकांमध्ये आनंद निर्माण झाला. मात्र आता नव्या अद्यादेशानुसार खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आपसुकच स्थानिक स्वराज्य संस्थामधील रिक्त जागांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून शिक्षक भरतीची चातकाप्रमाणे वाट पाहणाºया पदविकाधारकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे खाजगी अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समयोजन हे इतर खासगी अनुदानित शाळेत करावे, अशी मागणी डी.टी.एड, बी.एड. स्टूडंट असोसिएशनच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात रमेश गाडरे, अनुराग गाडेकर, दिपेंद्र बेंद्रे, हरिश येरणे, राहुल टिपले, नितीन शेें, नरेश कन्नाके, मुन्ना गेडाम, श्रीकांत साव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: The 'Ordinance' appeals to prospective teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.