चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा अद्यादेश अन्यायकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:55+5:302020-12-15T04:43:55+5:30
चंद्रपूर : शासनाने ११ डिसेंबर रोजी अध्यादेश काढून चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेऊन त्यांचे मानधन शालेय वेतनेत्तर अनुदानातून ...
चंद्रपूर : शासनाने ११ डिसेंबर रोजी अध्यादेश काढून चतुर्थ श्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेऊन त्यांचे मानधन शालेय वेतनेत्तर अनुदानातून देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शालेय वेतनेत्तर अनुदान वेळेत मिळत नाही. त्यामुळे हा अद्यादेश अन्यायकारक असून रद्द करावा, अशी मागणी अशी मागणी शिक्षकेत्तर संघटनेनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा शाळेचा अविभाज्य अंग आहे. शाळा सुरु होण्यापासून बंद होईपर्यंत विविध प्रकारची कामे करीत असतो. शाळेची घंटा मारणे, शाळेच्या इमारतीची निघा राखणे आदी कामे करीत असतो. मात्र आता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची निवड कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय घेवून त्यांचे चार ते पाच हजार रुपये मानधन शालेय वेतनेत्तर अनुदानातून देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे मानधन वेळेवर मिळत नाही. तर कधी मिळतच नाही. त्यामुळे वेतनाची समस्या निर्माण होणार आहे. तसेच या निर्णयामुळे गरजू व हुशार युवकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा अद्यादेश रद्द करावा, राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. यावेळी खासगी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अनिल शिंदे, सूर्यकांत खनके , विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंड, वासाडे, लक्ष्मण धोबे, विजय टोंगे, शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष अवधूत कोटेवार, विजय धर्मेलवार, संजय वझेलवार आदी उपस्थित होते.