सडक्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत
By admin | Published: June 8, 2016 12:45 AM2016-06-08T00:45:39+5:302016-06-08T00:45:39+5:30
‘स्वच्छ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला संपूर्ण देशभरातच मूर्तरुप येऊ लागल्याचा प्रत्यय अनुभवास येत असतानाच ...
अहीर यांची भेट : चंद्रपूर बाजार समितीचा उपक्रम
चंद्र्रपूर : ‘स्वच्छ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला संपूर्ण देशभरातच मूर्तरुप येऊ लागल्याचा प्रत्यय अनुभवास येत असतानाच चंद्रपूरसारख्या प्रदूषित महानगरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये भाजीपाला व अन्य टाकावू असलेल्या सडीक कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करणाऱ्या प्रायोगिक तत्वावरील युनिटची उभारणी स्वच्छ भारत या संकल्पनेस साकार करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच वेस्ट टू कंपोस्टचे लक्ष्य गाठण्यासाठी चंद्रपूर महानगरात अशा अन्य युनिट प्रस्थापित करण्याचा मानस असल्याचे सांगत यासाठी सीएसआर व अन्य निधीच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हसंराज अहीर यांनी केले.
६ जून २०१६ रोजी हंसराज यांनी चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रागंणात स्थापित झालेल्या या युनिटला भेट देवून प्रत्यक्ष प्रात्याक्षिक बघितले. यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, उपसभापती रणजित डवरे, भाजप नेते विजय राऊत, उपमहापौर वसंता देशमुख, मनपा गटनेते अनिल फुलझेले, राजेश मुन, राहुल सराफ, नगरसेवकव्दय राहुल पावडे, देवानंद वाढई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)