संस्थांनी सामाजिक प्रश्नांवर कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:03 AM2017-10-04T00:03:10+5:302017-10-04T00:03:22+5:30
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया संस्थांनी धार्मिक उपक्रमांसोबतच जनहिताच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करावे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया संस्थांनी धार्मिक उपक्रमांसोबतच जनहिताच्या सामाजिक प्रश्नांवर कार्य करावे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
चंद्रपूरची आराध्य दैवत महाकाली मंदिराजवळील मैदानावर आयोजित दसरा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, नंदू नागरकर, दिनेश चोखारे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, युसूफ शिवाराव, दुर्गेश कोडाम, अमजद अली, राजेश अडूर, सुनिता अग्रवाल, एकथा गुरले, निता नवरखेले, सुनिता पटेल आदी उपस्थित होते. याप्रसंगी मंडळाचे संचालक संतोष लहामगे, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर लहामगे, उपाध्यक्ष जयेश वºहाडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रथम मंडळाचे संचालन संतोष लहामगे माजी स्थायी समिती अध्यक्ष, मनपा चंद्रपूर यांनी प्रास्ताविक भाषणात म्हणाले, मंडळाची निर्मिती १९५७ ला स्वस्तिक काच कारखाण्यात काम करणाºया मजुरांच्या वर्गणीतून झाली. चंद्रपुरातील देणगीदारांच्या सहकार्यानी आजही हा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी जनतेच्या विविध प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. बाबुपेठ उड्डाण पुलाबाबत नेत्यांनी अनेकदा आश्वासने दिली. पण कामाला सुरुवात झाली नाही. हजारो जनतेचे दोन रेल्वे फाटकामुळे बेहाल आहे. भविष्यात परिसरातील जनतेला या पासून सुटका मिळेल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अंचलेश्वर देवळाच्या जवळील किल्ला, झरपट नदीची दुर्दशा, महाकाली मैदानावरील वाढते अतिक्रमण तसेच अंचलेश्वर गेट ते कामगार चौक पर्यंत काँक्रेट रोडची मागणी केली. आमदार विजय वडेट्टीवार यांनी मंडळाच्या कार्याची प्रशंसा केल. जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, मंडळाच्या कार्यामुळे समाजात चांगल्या कार्याची परंपरा निर्माण झाली. राजकीय पक्षहित बाजूला सारून जनतेसाठी कार्य करणाºया सामाजिक संस्थांची आज उ समाजाला खरी गरज आहे.
आयोजनासाठी सचिन चहारे, सचिन पद्मावार, तुषार लहामगे, मोरेश्वर ताजणे, नरेश ठेंगरे, संदेश खांडरे, देवा दानव, अनिल पराते, जयप्रकाश देवर, मोहन गौरशेट्टीवार, अनंता देशपांडे, राकेश दुर्गे, प्रविन चहारे, कमलेश लहामगे, जावेद सय्यद, ऋषीकेश लहामगे, शुभम कुमरे, प्रफुल बेले, रंजित ठाकूर, चरण सिडाम आदींनी सहकार्य केले.
संचालन मंजुषा धाईत यांनी केले. आभार किशोर करपे यांनी मानले.