सिंदेवाहीत खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

By admin | Published: June 18, 2014 12:09 AM2014-06-18T00:09:12+5:302014-06-18T00:09:12+5:30

खरीप हंहाम २०१४-२०१५ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे तालुकास्तरीय खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांच्यातर्फे

Organized Kharif Pre-Farmers' Training | सिंदेवाहीत खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

सिंदेवाहीत खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

Next

सिंदेवाही : खरीप हंहाम २०१४-२०१५ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही येथे तालुकास्तरीय खरीप पूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही यांच्यातर्फे करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी दत्तात्रय कवठे, खुशाल अर्जुन सावसाकडे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. हरीष सवई, विभागीय कृषि संशोधन केंद्र सिंदेवाहीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एन.के. पतके, डॉ. एस. एन. पतकिले, एस.व्ही. कनेर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक एस. व्ही. कनेर यांनी केले. शेतकरी प्रशिक्षणाचा उद्देश व कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच डॉ. एन. के. पतके यांनी भात लागवड तंत्रज्ञान व भात पिकाच्या विविध सुधारित जातीबाबत शेतकऱ्यांना माहिती सांगितली. डॉ. हरिष सवाई यांनी धान पिकावरील विविध किड,रोग नियंत्रण व व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे समन्वयक डॉ. एस. एन. पोतकिले यांनी गळीत व कडधान्यपिकाच्या लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर भिसे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. दत्तात्रय मुरलीधर कवठे, खुशाल अर्जुन सावसाकडे यांनी शेतीविषयक अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी अनेक आपल्या समस्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. संंचालन जे.एम. पवार, आभार एम. सी ठिकरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Organized Kharif Pre-Farmers' Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.