पिपरबोडी येथे नैसर्गिक सहलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:47+5:302021-03-27T04:28:47+5:30

भद्रावती : राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी व सनियंत्रणाच्या बळकटीकरणासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, चंद्रपूर अंतर्गत भद्रावती तालुक्यातील ...

Organizing a natural trip at Pepperbody | पिपरबोडी येथे नैसर्गिक सहलीचे आयोजन

पिपरबोडी येथे नैसर्गिक सहलीचे आयोजन

Next

भद्रावती : राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी व सनियंत्रणाच्या बळकटीकरणासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, चंद्रपूर अंतर्गत भद्रावती तालुक्यातील पिपरबोडी येथील आधुनिक तंत्रज्ञान रोपवाटिकेमध्ये वन दिनानिमित्त नैसर्गिक सहलीचे आयोजन करण्यात आले होेते.

यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील विद्यार्थी व शिक्षक या सहलीत सहभागी झाले होते. प्राचार्य जयंत वानखेडे, प्राध्यापक नरेश जांभूळकर, रमेश चव्हाण, ज्ञानेश हटकर, माधव केंद्रे, कमलाकर हवाईकर, ए. एम. देशमुख, एम. यू. बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून क्षेत्र सहाय्यक एम. एन. सातभाई उपस्थित होते. त्यांनी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, नैसर्गिक रंग तयार करणे, पर्यावरण संरक्षण, इको क्लब शाळेचे बळकटीकरण करणे आदीवर मार्गदर्शन केले.

Web Title: Organizing a natural trip at Pepperbody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.