नाभिक समाज संघटीत होणे काळाची गरज

By admin | Published: February 10, 2017 12:56 AM2017-02-10T00:56:12+5:302017-02-10T00:56:12+5:30

नाभिक समाजाच्या विकासासाठी संघटनेची गरज असून समाजातील प्रत्येक व्यक्तीनी एकजुट होवून संघटीत होणे

Organizing the Nucleic Society The need for the time is to be organized | नाभिक समाज संघटीत होणे काळाची गरज

नाभिक समाज संघटीत होणे काळाची गरज

Next

विजय वडेट्टीवार : सिंदेवाहीत नगाजी महाराज पुण्यस्मरण सोहळा
सिंदेवाही : नाभिक समाजाच्या विकासासाठी संघटनेची गरज असून समाजातील प्रत्येक व्यक्तीनी एकजुट होवून संघटीत होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
सिंदेवाही येथे आयोजित संत शिरोमणी नगाजी महाराज तथा संत सेना महाराजाच्या पुण्यस्मरण महोत्सवात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रबोधन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नाभिक महामंळाचे महासचिव प्रभाकर फुलबांधे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहिनी गेडाम, कार्याध्यक्ष अंबादास पाटील, सचिव माधव चन्ने, संतोष कुरमेलवार, मधूकर क्षिरसागर, दामोधर मेंढूळकर, अमोल कडूकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम सकाळी संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. त्यानंतर प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शंभर वर्षावरील वयोवृद्ध समाजबांधव चंपत घुमे व सखूबाई घुमे, नगराध्यक्ष मोहिनी गेडाम यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार तर पीएचडी प्राप्त मधूकर नक्षिणे, हिरालाल मेश्राम, गुणवंत विद्यार्थीनी दर्शना मेश्राम, लक्ष्मी लांजेवार, जीजा भंडारे यांचा गौरव करण्यात आला.
या मेळाव्यात प्रभाकर फुलबांधे, अंबादास पाटील, माधव चन्ने, मधूकर क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नाभिक समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन आमदार विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले. पालखी मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेवून सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन नाभिक समाजाचे अध्यक्ष कवडू मांडवकर तर आभार सचिव ज्ञानेश मुत्येलवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी नाभिक समाजाचे पदाधिकारी, महिला मंडळ, नवयुवक मंडळानी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Organizing the Nucleic Society The need for the time is to be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.