ऑनलाईन बुद्ध भीम गीत स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:14+5:302021-03-21T04:27:14+5:30
कंत्राटी चालकांना तटपुंजे वेतन चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांना अत्यल्प वेतन दिल्या जात आहे. ...
कंत्राटी चालकांना तटपुंजे वेतन
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी वाहनचालकांना अत्यल्प वेतन दिल्या जात आहे. परिणामी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे वेतन वाढ करावी, अशी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
बाजारात फळांची आवक वाढली
चंद्रपूर : उन्हाळा सुरु झाला असल्याने फळ बाजारात टरबूज, कलिंगड, केळी आदी फळे पहायला मिळत आहेत. कोरोनामुळे फळे खाण्याचा सल्ला दिला असल्याने बाजारात फळांची मागणी वाढली आहे. त्यामुळे किंमतीही वाढल्याचे दिसून येत आहे.
फाटलेल्या नोटांमुळे नागरिकांची वाढली डोकेदुखी
चंद्रपूर : आर्थिक देवाण-घेवाण करण्याकरिता अनेक ग्राहक बँकामार्फत व्यवहार करतात. मात्र ही आर्थिक देवाण घेवाण करताना ग्राहकांना बँकेतर्फे नोटांच्या बंडलातून मोठ्या प्रमाणात फाटलेल्या नोटा दिल्या जात आहेत. ग्राहकांना फाटलेल्या नोटा बँकेला परत दिल्यास संबंधित अधिकारी त्या नोटा परत घेत नसल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहेत.
पीक विमा योजनेतील त्रुटी दुर कराव्यात
चंद्रपूर : खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली. परंतु, या योजनेतील त्रुटी दूर न झाल्याने शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात. शिवाय, मोबदला अल्प प्रमाणात मिळतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी विम्याच्या कक्षेत यावेत आणि मोबदल्याचे प्रमाण वाढावे, याकरिता शासनाने पीक विमा योजनेत तातडीने न्यायपूर्ण बदल करण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.
जटपूरा गेट परिसरात पाण्याचा अपव्यय
चंद्रपूर : शहरातील पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. अशातच जटपूरा गेट परिसरात असलेल्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षपणामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई सुरू आहे. अनेक भागात पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
सुविधा उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारामध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात तच चिखल तयार होते. त्यामुळे सुविधा उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.
बांधकाम साहित्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील अनेक प्रभागातील ले-आऊटमध्ये घरांचे बांधकाम सुरु आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून साहित्य टाकण्यात आले असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बहुतांश तलावात ठणठणाट
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे तलाव, बोड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होत नाही. यावेळीही तसेच झाले. मात्र आता जिल्ह्यातील अनेक तलाव, बोड्यांमध्ये पाणी नसून ते कोरडे पडले आहे.
तापमानाचा मोकाट श्वानांवर परिणाम
चंद्रपूर : स्थानिक इतवारा बाजार व पुलफैल भागात मोठ्या प्रमाणात मोकाट श्वान आहेत. वाढत्या उष्णतामानामुळे या श्वानांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला असून ते वाहन चालकांकरिता घातक ठरू लागले आहे. वाढते उष्णतामान मोकाट श्वानांकरिता हानीकारक आहे. या उष्णतामानाच्या दिवसात श्वानांना थंड ठिकाणाची व थंडाव्याची नितांत गरज असते.
समाजमंदिराकडे होतेय दुर्लक्ष
चंद्रपूर : दलित वस्तीसुधार योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या वस्तीत सुधरणा घडवून आणण्यासाठी सिमेंटचा रस्ता, बांधकाम पिण्याचे पाणी, गटारे आणि समाजभवन बांधण्याचे शासनाचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून या योजना राबविल्या जातात. पण समाजभवनाचा उपयोग योग्य तºहेने होत नाही. परिणामी शासनाचा पैसा वाया जात असल्याचे दृश्य ग्रामीण भागात आहे.
जिल्ह्यातील ग्राहकांना प्रबोधनाची गरज
चंद्रपूर : आजच्या स्थितीत अनेकांच्या घरात फ्रीज, टिव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, स्वयंपाकी गॅस, कुलर, ओव्हन, विद्युत इनवर्टर, दुचाकी व चारचाकी आदी मोठ्या प्रमाणात आढळतात. उच्चभ्रू व नोकरदार वर्गाकडे तर यातील बहुतेक वस्तु असतातच. मात्र त्यातील अनेक वस्तुंची निगा, सुरक्षितता व अचानक धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास कशी व कोणती तात्काळ उपाययोजना करायची, याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे ज्या उपाययोजना करणे धोक्याच्या असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे इलेक्ट्रानिक वस्तूंच्या सुरक्षेबाबत गावात तसेच शहरातसुद्धा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
फुटपाथवरील अतिक्रमण हटवावे
चंद्रपूर : येथील महात्मा गांधी ते जटपुरागेटपर्यंत काही व्यावसायिक फुटपाथवर वाहन पार्किंग तसेच अनेक व्यवसायिक साहित्य विक्रीसाठी ठेवत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच रस्ते अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फुटपाथवरील वाहनांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दाताळा मार्गाचे सौंदर्यीकरण करा
चंद्रपूर : इरई नदीच्या पुलावर अत्याधूनिक पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र रामनगर चौकापासून तर पुलापर्यंच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी फुटपाथ नसल्याने तसेच काही ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जड वाहने येत असल्यामुळे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करून रस्त्याची दुरुस्ती तसेच सौंदर्यीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.