समृद्ध बजेटसाठी गाव शिवार फेरीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:52+5:302021-09-22T04:30:52+5:30
शिवार फेरीमध्ये मुख्य पाणलोट क्षेत्राचे नियोजन करणे, नदी, तलाव,धरण, पाझर तलाव, माथा ते पायथा उपचार सीसीटी, कंटूरबांध, विहीर पुनर्भरण, ...
शिवार फेरीमध्ये मुख्य पाणलोट क्षेत्राचे नियोजन करणे, नदी, तलाव,धरण, पाझर तलाव, माथा ते पायथा उपचार सीसीटी, कंटूरबांध, विहीर पुनर्भरण, सिंचन विहीर, फळबाग लागवड, वृक्ष लागवड, इत्यादी अनुषंगाने शिवाराचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक एस. मरापे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत स्थानिक ग्रामस्थांना महत्त्व सांगून त्याबाबत मार्गदर्शन केले. तलाठी विनोद गेडाम यांनी तलाठी कार्यालय वरूर रोड येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई-पीक पाहणी ॲपद्वारे स्वतः शेतकरी आपल्या शेतातील पिकांची सातबारा उताऱ्यावर नोंद कशी करू शकतो याबाबत उपस्थित शेतकऱ्यांच्या स्मार्ट मोबाइलवर ई-पीक पाहणी ॲप बाबतची कार्यपद्धती व महत्त्व समजावून सांगितले. कृषी सहायक दीपक काळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील कीड व रोग कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व बोंडसड रोग नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले व कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ५० टक्के अनुदानावर गहू ,हरभरा, ज्वारी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवार फेरीला माजी ग्रामपंचायत सदस्य आबाजी धानोरकर, तलाठी विनोद गेडाम, ग्रामसेवक सीताराम मरापे कृषी सहायक दीपक काळे, कृषिमित्र विशाल शेंडे, स्थानिक नागरिक विनोद वैरागडे, गोपाल निमकर ,प्रवीण डहाके, श्यामसुंदर हिवरे, दीपक झाडे, प्रवीण चौधरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
210921\img-20210917-wa0076.jpg
समृद्ध बजेट करीता गाव शिवार फेरी