बीआयटीमध्ये ओरिएंटेशन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:27+5:302021-02-23T04:44:27+5:30
चंद्रपूर : नॅक मानांकित बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी येथे वसंत पंचमीचे औचित्य साधून संस्थेमध्ये अभियांत्रिकी विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या ...
चंद्रपूर : नॅक मानांकित बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाॅजी येथे वसंत पंचमीचे औचित्य साधून संस्थेमध्ये अभियांत्रिकी विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी परंपरेनुसार ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बीआयटीचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, बीआयटीचे डायरेक्टर डॉ. रजनीकांत, प्राचार्य श्रीकांत गोजे, विभागप्रमुख मुकेश सिंग चव्हाण तर मार्गदर्शक म्हणून आयआयटी मुंबईचे डॉ. राजकुमार पंत उपस्थित होते.
यावेळी डॉ. पंत यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण, त्यातील बारकावे, महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. संस्था अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. रजनीकांत यांनी अभियांत्रिकीमधील नवीन अभ्यासक्रम फूड टेक्नॉलाॅजी आणि एमटेक मायनिंग इंजिनिअरिंग विभागाबद्दल माहिती दिली. यावेळी बीआयटीचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य श्रीकांत गोजे, मुकेश सिंग चव्हाण, अमृता बल्लाळ आदींनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. कीर्ती पद्द्मावार तर आभार डॉ. अर्चना निमकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सागर भट, वैभव मत्ते, संजय बुरांडे आदींनी परिश्रम घेतले.