२२ लाख ४२ हजारपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:41+5:302021-05-28T04:21:41+5:30

जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची ...

Out of 22 lakh 42 thousand, only 3 lakh 44 thousand citizens got vaccinated | २२ लाख ४२ हजारपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

२२ लाख ४२ हजारपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

Next

जानेवारी महिन्यात लसीकरण सुरू करताना आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून लस घेणाऱ्या प्राधान्य गटातील २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांची नोंदणी केली. त्यामध्ये हेल्थ केअर वर्क, फ्रंट लाईन वर्कर, सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आणि १९ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून लस पुरविण्याचे नियोजनच कोलमडले. त्यामुळे मोठा गाजावाजा करून १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याच्या घोषणेचा फुगा फुटला. या गोंधळात राज्यांवर अवलंबून असणाऱ्या मनपा आरोग्य विभाग व जि. प. आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. अखेर १८ वर्षांवरील लसीकरण थांबविण्यात आले. आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे दैनंदिन नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेला करावे लागत आहे. डोस मिळाले तर केंद्र सुरू अन्यथा बंद अशी कसरत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करीत आहेत. जिवतीत सर्वात कमी ५ हजार २६७ जणांनी तर भद्रावती तालुक्यात तालुक्याच्या तुलनेत २८ हजार ४७४ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात लस घेण्यास पात्र असणाऱ्या २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांपैकी आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ६७० जणांना डोस घेता आले.

तिसऱ्या लाटेच्या भीतीने केंद्रांवर गर्दी

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख घसरत आहे. ही दिलासादायक बाब आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने प्रत्येक नागरिकाला प्रतिबंधात्मक लस पुरविणे तातडीची गरज आहे. केंद्र सरकारचे लस धोरण नियोजन फसल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे नागरिक लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत.

चंद्रपुरात फक्त ७६ हजार जणांनीच घेतला डोस

चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ३ लाख ५५ हजार १६१ नागरिक लस घेण्यास पात्र आहेत. त्यापैकी बुधवारपर्यंत ७६ हजार ७०१ नागरिकांनी डोस घेतला. यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्या ३३ हजार ३५ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मनपाने केंद्र वाढवून पुरेशी लस मिळत नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील लसीकरणाचे प्रमाणही अल्पच आहे.

लसीअभावी मोहिमेत खोडा

६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी चंद्रपूर मनपा क्षेत्रात सात आठ केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे. पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरूद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल.

तालुका लोकसंख्या लसीकरण

राजुरा १३५८५०- १७७५६

वरोरा १८३७३२- २३२२०

ब्रह्मपुरी १६९३११- २५७४३

भद्रावती १५२५१५-२८४७४

चिमूर १६८५८८-१३२१९

मूल ११४९४२-१८५३६

सिंदेवाही ११४८१९-१५७३९

चंद्रपूर ग्रामीण १५०१५८-२५४०७

बल्लारपूर १३५५०९-२१५८८

कोरपना १२३७५३-१८७४९

सावली १०६२८२-१५४०९

गोंडपिपरी ८१३९६- १०७५२

नागभीड १३४३२०- १८०३९

जिवती ६४६३८-५२६७

पोंभुर्णा ५१०८८-१००७१

चंद्रपूर मनपा क्षेत्र ३५५१६१- ७६७०१

एकूण २२४२०६२- ३४४६७०

Web Title: Out of 22 lakh 42 thousand, only 3 lakh 44 thousand citizens got vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.