२५ लाखांतून चंद्रपुरात खोदणार १३ हातपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:04+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, याकरिता २५ लाखांच्या निधीतून १३ हातपंप खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही सर्व कामे प्रगतीपथावर असल्याने आठ दिवसात पाण्याची समस्या दूर होणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही काही प्रभागात हिच परिस्थिती निर्माण झाली आहे. योग्य नियोजनाअभावी पाण्याची कृत्रिम टंचाई भासते. ही टंचाई दूर करण्याची मागणी नागरिकांकडून दरवर्षी केली जाते. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक निधीतून २५ लाखांचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे शहरातील विविध १३ प्रभागांमध्ये हातपंप खोदकामाला मंजुरी मिळाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील हातपंप खोदकामाला सुरूवात झाली आहे. शहराला इरई नदीतून पाणी पुरवठा केला जातो. बऱ्याच वर्षांपासून मनपाने कंत्राटदाराकडून शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जात होता.
शहरातील नागरिकांना पिणचे पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी झाल्याने हा कंत्राट रद्द करण्यात आला. मात्र पाणी टंचाईची समस्या संपली नाही. सध्या उन्हाचा पारा भडकल्याने काही वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वार्डनिहाय हातपंप
अष्टभुजा वार्ड, महाकाली प्रभाग, बालाजी प्रभाग, इंन्डिस्ट्रीयल इस्टेट वार्डात प्रत्येकी २, बिनबा प्रभाग १, गंजवार्ड १, गायत्री शक्ती पीठ, दाताळा १, बाबूपेठ आम्रपाली विहार १ व बागला चौकात १ याप्रमाणे १३ हातपंप खोदण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवातही करण्यात आली आहे.