गाईड संपावर ठाम जिप्सीमालक बाहेर

By admin | Published: May 13, 2017 12:27 AM2017-05-13T00:27:28+5:302017-05-13T00:27:28+5:30

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या गाईडनी शासकीय सेवेमध्ये घेण्याची मागणी ....

Out of the gypsymagler on the guides | गाईड संपावर ठाम जिप्सीमालक बाहेर

गाईड संपावर ठाम जिप्सीमालक बाहेर

Next

ताडोबा व्याघ्र प्रकल्प : आजपासून आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या गाईडनी शासकीय सेवेमध्ये घेण्याची मागणी करीत १३ मे रोजीपासून संप पुकारला आहे. या संपावर गाईड ठाम असून त्यांचा सहकार्य करण्याचा निर्णय घेणाऱ्या जिप्सी मालकांनी मात्र शुक्रवारी संपातून माघार घेतली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) उपसंचालक डॉ. किशोर मानकर यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या सर्वच पर्यटकांना ताडोबा प्रकल्पाची माहिती नसते. देश-विदेशातील पर्यटकांना जंगलात पर्यटन करताना ताडोबातील गाईड मार्गदर्शन करीत असतात. ताडोबामध्ये अंदाजे २०० गाईड काम करीत आहेत. त्यांना कामाच्या बदल्यात पर्यटकांकडून मोबदला मिळत असतो. त्यांचे काम मुख्यत्वे पर्यटनाच्या काळात चालत असते. उर्वरित काळात त्यांना गाईडचा रोजगार मिळत नाही.
या गाईडनी शासनाकडून मानधन मिळण्याची मागणी करीत १३ व १४ मे रोजी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. गाईडच्या मागण्यांना पाठिंबा देत जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटी या जिप्सी मालकांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटकांना जिप्सी जंगलाची सफर घडवित असतात. जिप्सी मालकही संपात सहभागी होणार असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. गाईड आणि जिप्सीमालक संपावर गेले असते तर पर्यटकांना त्रास सहन करावा लागला असता. परंतु जिप्सी संघटना शुक्रवारी संपातून बाहेर पडली आहे.

जिप्सी भाडेवाढीचा
प्रस्ताव पाठविणार
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) उपसंचालक डॉ. किशोर मानकर यांच्या कार्यालयात जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संपाबाबत शुक्रवारी दुपारी चर्चा केली. त्यामध्ये जिप्सी भाडेवाढ करण्यात यावी, जंगलात जाणाऱ्या जिप्सी चालकांचा विमा काढण्यात यावा, वन रस्ते दुरूस्त करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये जिप्सी भाडेवाढीचा प्रस्ताव समितीकडे पाठविण्यास उपसंचालक डॉ. मानकर यांनी तत्वत: मान्यता दिली. तर जंगलातील वन रस्ते दुरूस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले. दोन मागण्यांवर सहमती झाल्याचे जिप्सी इको टुरिस्ट वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय मानकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Out of the gypsymagler on the guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.