जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:36+5:30

विशेष म्हणजे, रविवारी आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ३४ बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्यातही बहुतेक बाधित हे संपर्कातूनन पुढे आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊन नोंद व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Outbreak of corona infection in the district | जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी ९४ रुग्णांची भर : आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी कोरोना संसर्गाने कहरच केला आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल ९४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंतचा एका दिवसात वाढलेल्या रुग्णाां हा सर्वाधिक आकडा ठरला आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १४४८ झाली असून ९५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ४८० जणांवर उपचार सुरू आहे.
विशेष म्हणजे, रविवारी आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ३४ बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्यातही बहुतेक बाधित हे संपर्कातूनन पुढे आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावी. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाला माहिती देऊन नोंद व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील व परिसरातील ३४, वरोरा येथील १३, बल्लारपूर येथील आठ, कोरपना व मूल येथील प्रत्येकी आठ, भद्रावती येथील दोन, पोंभुर्णा व सिंदेवाही येथील प्रत्येकी एक, नागभीड येथील १०, राजुरा येथील पाच, ब्रम्हपुरी येथील चार अशा ९४ बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील गोपालपुरी वार्ड, हनुमान नगर तुकुम परिसरातील, रामनगर, दादमहाल वार्ड, वडगाव, पडोली, बाबुपेठ, पठाणपुरा वार्ड, बालाजी वार्ड इत्यादी परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत.
वरोरा येथील अभ्यंकर वार्ड, कर्मवीर वार्ड परिसरातील बाधित पुढे आले आहेत. बल्लारपूर येथील दादाभाई नौरोजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, बालाजी वार्ड, कन्नमवार वार्ड परिसरातील बाधित ठरले आहेत.
कोरपना शहरातील तसेच तालुक्यातील गिरगाव येथील बाधित पुढे आले आहेत. राजुरा, विरुर, गांधी चौक टेंभुरवाही परिसरातील बाधित ठरले आहेत. मूल तालुक्यातील बाधितांमध्ये कवडपेठ, फिस्कुटी, कांतापेठ येथील बाधितांच्या समावेश आहे.
नागभीड तालुक्यातील बाळापूर, चिखल परसोडी येथील नागरिक बाधित ठरले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेवनगर तसेच तालुक्यातील मेंडकी, गांगलवाडी येथीलही काही जणाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहेत.

आणखी एकाचा मृत्यू
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ५५ वर्षीय बाजार वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त इतर आजार होता, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. या बाधिताचा १९ ऑगस्टला स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर २२ ऑगस्टच्या सायंकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १३ वा मृत्यू आहे.

सर्वाधिक बाधित तरुणच
जिल्ह्यात आतापर्यंत १४४८ बाधित पुढे आले आहेत. यापैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील २९ बाधित, ६ ते १८ वर्ष वयोगटातील १२२ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक म्हणजे ८१३ बाधित आहेत. ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ३६९ बाधित, ६१ वर्षावरील ८५ बाधित आहेत. तसेच एकूण १४४८ बाधितांपैकी ९८६ पुरुष तर ४६२ बाधित महिला आहेत.

Web Title: Outbreak of corona infection in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.