शिक्षण शुल्क वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:06 AM2021-07-13T04:06:52+5:302021-07-13T04:06:52+5:30

पालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट मूल : कोरोना संक्रमणामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. शिक्षणावरही मोठा परिणाम झाला. आजही शाळा ...

Outcry among parents against increase in tuition fees | शिक्षण शुल्क वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश

शिक्षण शुल्क वाढीच्या विरोधात पालकांमध्ये आक्रोश

Next

पालकांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट

मूल : कोरोना संक्रमणामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. शिक्षणावरही मोठा परिणाम झाला. आजही शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने अनेक शाळेने भरमसाठ शुल्क आकारणे सुरू केले आहे, यामुळे पालकांमध्ये आक्रोष निर्माण झाला आहे. शिक्षण शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी पालकांनी मूलच्या अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन दिले.

मूल तालुक्यात अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. मुलांना शिक्षण चांगले मिळत असल्याने पालकांनी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. सर्व सुरळीत असताना देशात कोरोना संसर्ग फोफावला आणि शासनाने काही दिवसासाठी शाळा बंद करण्याचे आदेश दिले. मूल येथील अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे कारण पुढे करून भरमसाठ शिक्षण शुल्क पालकांकडून वसूल केले जात आहे. शिक्षण शुल्क भरले नाही तर विद्यार्थ्यांना टार्गेट केले जाते. विद्यार्थी घरी येऊन पालकांना शुल्क भरण्यासाठी रडगाणे लावतात. कोरोना परिस्थिती निर्माण झाल्याने टाळेबंदी लागू करण्यात आली, यामुळे अनेक पालकांचा रोजगार बुडालेला आहे. मात्र शिक्षण संस्था शिक्षण शुल्क भरण्यासाठी पालकांकडे वारंवार तगादा लावतात, यामुळे पालकांमध्ये शाळेप्रति तीव्र रोष व्यक्त करीत खासगी शाळा पालक संघर्ष समिती निर्माण करण्यात आली. या समितीने सोमवारी मूलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी, गटशिक्षणाधिकारी खांडरे, मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, आणि नगरपालिकेचे शिक्षण सभापती मिलिंद खोब्रागडे यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदन देताना पालक नंदकिशोर रणदिवे, प्रशांत समर्थ, राकेश रत्नावार, मंगेश पोटवार, विवेक मुत्यालवार, मनीष येलट्टीवार, ॲड. बल्लू नागोशे, श्याम उराडे, राकेश ठाकरे, संजय भुसारी, गिरीश कांचनकर, भोजराज गोवर्धन, अजय गड्डमवार, विनोद कामडी, आरीफ पठाण, कुमार दुधे, गणेश रामशेट्टीवार, गौतम जीवने, अरविंद करपे, अमित राऊत, प्रशांत गट्टुवार, गौरव श्यामकुळे यासह मोठ्या संख्येनी पालक उपस्थित होते.

Web Title: Outcry among parents against increase in tuition fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.