जबरानजोत शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयासमोर आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:37+5:302021-06-26T04:20:37+5:30

फोटो मूल: मूल तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या ...

Outcry of Jabranjot farmers in front of tehsil office | जबरानजोत शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयासमोर आक्रोश

जबरानजोत शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयासमोर आक्रोश

Next

फोटो

मूल: मूल तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात मूल तहसील कचेरीसमोर अन्यायग्रस्त जबरानजोत शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले.

मूल तालुक्यात असंख्य जबरानजोत शेतकरी आहेत. मागील कित्येक वर्षांपासून शेतकरी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. वनजमिनीचे पट्टे मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे दावेसुद्धा टाकलेले आहेत. परंतु वनविभागाचा व प्रशासनाचा दिवसेंदिवस शेतकऱ्यांवरचा अत्याचार वाढत आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाला घेऊन मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. धरणे आंदोलनात वनविभागाच्या शेतकरीविरोधी धोरणाला घेऊन तीव्र निदर्शने व नारेबाजी करण्यात आली.यावेळी वनहक्क कायद्यानुसार आदिवासी व गैर आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. वन विभागाचा शेतकऱ्यांवरचा वाढता अन्याय बंद करण्यात यावा. मूल तालुक्यातील जबरानजोत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा तत्काळ निपटारा करण्यात यावा. तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करण्यात यावी, अशा मूलभूत मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गावतुरे, महासचिव जयदीप खोब्रागडे, संपत कोरडे, सचिन पावडे, रोहित बोबाटे, कविता गौरकर, मधुकर उराडे उपस्थित होते.

Web Title: Outcry of Jabranjot farmers in front of tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.