जीर्ण झालेल्या पं. स. कार्यालयाला नवीन इमारतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:10+5:302021-09-05T04:32:10+5:30
विनायक येसेकर भद्रावती : पंचायत समिती भद्रावतीची इमारत मागील कित्येक वर्षापासून जीर्ण अवस्थेत उभी आहे. डागडूजी करून येथील अधिकारी ...
विनायक येसेकर
भद्रावती : पंचायत समिती भद्रावतीची इमारत मागील कित्येक वर्षापासून जीर्ण अवस्थेत उभी आहे. डागडूजी करून येथील अधिकारी व कर्मचारी आपले कामकाज काढत आहे. या जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीवर आजपर्यंत लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०१४ मध्ये इमारतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला; मात्र निधीअभावी प्रस्ताव धूळ खात आहे.
पंचायत समितीच्या इमारतीला ६० वर्षाचा कार्यकाळ लोटला आहे. इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. याकरिता ४ सप्टेंबर २०१४ च्या पंचायत समिती येथे झालेल्या मासिक सभेत नवीन इमारत बांधकाम मंजुरी प्रस्ताव सादर केला. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांनी २०१९ मध्ये यासंदर्भात तहसील कार्यालय भद्रावती यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच यासंदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनीसुद्धा जिल्हा परिषद सभेत मागणी केली होती; परंतु अजूनही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.
040921\img-20210904-wa0116.jpg
जीर्ण झालेल्या पंचायत समिती कार्यालयाला नवीन इमारतीची प्रतीक्षा.