कमल क्लबतर्फे चिनी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:32 PM2017-10-15T23:32:06+5:302017-10-15T23:32:16+5:30

दिवाळी सणाच्या निमित्ताने चंद्रपूर बाजारपेठमध्ये चिनी उत्पादीत वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालण्यासाठी व चिनी वस्तूंची विक्री करणाºया प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्याकरिता चंद्रपूरातील कमल स्पोर्र्टिंंग क्लबच्या वतीने....

The outspoken movement of the Chinese objects by Kamal Kluh | कमल क्लबतर्फे चिनी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन

कमल क्लबतर्फे चिनी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन

Next
ठळक मुद्देचिनी वस्तूंचा निषेध : स्वदेशी मालाचा स्वीकार करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवाळी सणाच्या निमित्ताने चंद्रपूर बाजारपेठमध्ये चिनी उत्पादीत वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार घालण्यासाठी व चिनी वस्तूंची विक्री करणाºया प्रवृत्तीचा निषेध नोंदविण्याकरिता चंद्रपूरातील कमल स्पोर्र्टिंंग क्लबच्या वतीने बहिष्कार व निषेध आंदोलन शनिवारी सायंकाळी करण्यात आले.
स्थानिक गांधी चौक येथे सायं ६.०० वाजता शेकडो युवकांनी चीनविरूध्द नारे देत चिनी उत्पादनास बाजारपेठेतून हद्दपार करा, खरेदीवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंची खरेदी करा, देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहचविण्यास कारणीभूत ठरलेल्या चिनी वस्तूंचा वापर नागरिकांनी टाळावा व भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला संपन्न राष्ट्र म्हणून घडविण्यात योगदान द्यावे, असे आवाहन कमल स्पोर्टिंग क्लबच्या वतीने सदर आंदोलनातून करण्यात आले.
यावेळी कमल स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी चीननिर्मित वस्तंूवर बहिष्कार घालण्याचे कारण याबाबत सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून केले. भारतीय बाजारपेठेत चीन उत्पादित वस्तूंच्या आक्रमणाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाल्याचे सांगत राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला मारक ठरलेल्या चिनी वस्तूंवर बहिष्कार हेच खºया राष्ट्रभक्तीचे द्योतक ठरेल, असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष सुरज पेदूलवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भारताविरूध्द सदैव कारस्थान करून पाकिस्थानला चेतावनी देतांनाच आर्थिक व संरक्षण विषयक सहकार्य करणाºया चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तुंवर बहिष्कार करावे, असे प्रतिपादन केले. यावेळी कृपेश बडकेलवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल गायकवाड यांनी चिनी वस्तूची खरेदी करणार नाही,अशी शपथ सर्व उपस्थितांना दिली.
यशस्वीतेसाठी कमल स्पोर्टींग क्लबचे मार्गदर्शक मोहन चौधरी, कमल स्पोर्टींग क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन कपिश उजगांवकर तर उपस्थिताचे आभार अभिनव लिंगोजवार यांनी मानले. यावेळी महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक, महिला, पुरूष, युवक-युवती आदी उपस्थिती होती.

Web Title: The outspoken movement of the Chinese objects by Kamal Kluh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.