चंद्रपूर शहरातील शंभरावर मुली झाल्या आत्मनिर्भर, शिवणकलेचे मिळाले प्रशिक्षण

By साईनाथ कुचनकार | Published: August 16, 2023 05:30 PM2023-08-16T17:30:55+5:302023-08-16T17:31:43+5:30

‘संकल्प’चा पुढाकार : उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन

over 100 girls in Chandrapur city became self-reliant, got training in sewing | चंद्रपूर शहरातील शंभरावर मुली झाल्या आत्मनिर्भर, शिवणकलेचे मिळाले प्रशिक्षण

चंद्रपूर शहरातील शंभरावर मुली झाल्या आत्मनिर्भर, शिवणकलेचे मिळाले प्रशिक्षण

googlenewsNext

चंद्रपूर : येथील इंदिरानगर परिसरातील संकल्प संस्थेतर्फे गरजू मुलींना शिवणकला प्रशिक्षण दिले जात आहे. या अंतर्गत शंभरावर मुलींनी प्रशिक्षण घेऊन त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या या मुलींसाठी समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक भुक्ते, मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद राऊत, हृदरोगतज्ज्ञ तथा संस्थेचे संस्थापक डॉ. अशोक वासलवार, संस्थेच्या सचिव डॉ. सिमला गाजर्लावार आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहणे काळाची गरज असल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे व्यवस्थापक कुंदन सतीश खोब्रागडे, तर आभार सचिव डॉ. सिमला गाजर्लावार यांनी मानले. कार्यक्रमाला चिंतामण येवले, एकनाथ रासेकार, दौलत पंडीले, हेमराज चौधरी आदींनी सहकार्य केले.

Web Title: over 100 girls in Chandrapur city became self-reliant, got training in sewing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.