14 हजारांवर रुग्ण कोरोनातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:00 AM2020-11-09T05:00:00+5:302020-11-09T05:00:15+5:30

आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे.

Over 14,000 patients released from Corona | 14 हजारांवर रुग्ण कोरोनातून मुक्त

14 हजारांवर रुग्ण कोरोनातून मुक्त

Next
ठळक मुद्दे१६१ नवे बाधित : २४ तासात एकही रुग्ण दगावला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
जिल्ह्यात रविवारी एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर १७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच १६१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १६ हजार ९४७ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत १४ हजार १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या दोन हजार ६७० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २६ हजार ४०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख सात हजार ९२३ नमुने निगेटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय नवे बाधित
जिल्ह्यात रविवारी पुढे आलेल्या १६१ बाधितांमध्ये ९० पुरुष व ७१ महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील ६३, पोंभुर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील १६, मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील १५, नागभिड तालुक्यातील नऊ, वरोरा तालुक्यातील १३, भद्रावती तालुक्यातील ११, सिंदेवाही तालुक्यातील सात, राजुरा तालुक्यातील सहा, गडचिरोली चार तर भंडारा येथील एक असे एकूण १६१ बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागातील बाधित
बल्लारपूर तालुक्यातील दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.राजुरा तालुक्यातील पेठ वार्ड, पांढरवणी, रमाबाई वार्ड, आर्वी भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील आजाद वार्ड, गजानन नगर, बामर्डा, पद्मालया नगर, आशीर्वाद लेआउट, विठ्ठल मंदिर वार्ड, इंद्रा नगरी बोर्डा, जामखुला, गाडगे नगर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, रेणुका माता चौक, देलनवाडी, झाशी राणी चौक, विदर्भ इस्टेट परिसर, पटेल नगर, नान्होरी, कपिल नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा, घोडपेठ, राधाकृष्ण कॉलनी परिसर, सुमठाणा, चंदनखेडा, देऊळवाडा, डिफेन्स चंदा परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, काटवल, देवाडा, रत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील चिधिंचक, शिवनगर, वसुंधरा कॉलनी परिसर, सुलेझरी, सुंदर नगर, देवतक, प्रगती नगर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु, गांधी वार्ड, नेरी, तळोधी, टिळक वार्ड, नेहरू चौक परिसर, मासळ, मोटेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर ६, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चंद्रपुरात येथे आढळले नवे बाधित
चंद्रपूर शहरातील व परिसरातील भिवापुर वॉर्ड, गोपालपुरी,बालाजी वार्ड, जटपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, पडोली, गणेश नगर तुकूम, भानापेठ वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, खुटाळा, वृंदावन नगर, नगीना बाग, वडगाव पद्मापूर, धानोरा पिंपरी, श्रीराम चौक, अरविंद नगर, कैलाश नगर नांदगाव, घुगुस, गंजवार्ड, बाबुपेठ, सुभाष नगर, ऊर्जानगर, द्वारका नगर, सौगात नगर, एकोरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

Web Title: Over 14,000 patients released from Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.