तब्बल ४१ हजार ४०८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:50+5:302021-04-30T04:36:50+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १,०६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर१,७४१ कोरोना ...

Over 41 thousand 408 patients overcome corona | तब्बल ४१ हजार ४०८ रुग्णांची कोरोनावर मात

तब्बल ४१ हजार ४०८ रुग्णांची कोरोनावर मात

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १,०६४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर१,७४१ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून २९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकूण ५८ हजार ६४५ बाधितांपैकी ४१ हजार ४०८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सध्या १६ हजार ३६० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ७३ हजार ४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ९ हजार ५६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

आजचे मृत्यू

गुरुवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगिनाबाग येथील ६३ वर्षीय पुरुष, ५३,६० व ६८ वर्षीय पुरुष, लालपेठ कॉलनी परिसरातील ५० वर्षीय पुरुष, बाबूपेठ येथील ४५,५५ व ६७ वर्षीय महिला, रामनगर परिसरातील ५५ वर्षीय महिला, अरविंद नगर येथील ८४ वर्षीय महिला, सरकार नगर येथील ५० वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुष, वायगाव येथील ६० वर्षीय पुरुष, ७० व ८७ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, विसापूर येथील ६० वर्षीय महिला. ६५ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील ४५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील ५० ‌व ५२ वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुष, सरडपार येथील ६५ वर्षीय महिला, आडेगाव येथील ४३ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ४९ व ५७ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८७७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ८१२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २५, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

तालुकानिहाय नवे बाधित

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र- ४९७

चंद्रपूर तालुका- १४२

बल्लारपूर-१०४

भद्रावती-१०६

ब्रम्हपुरी- १२१

नागभीड- ३९

सिंदेवाही-११६

मूल- १२३

सावली- ३९

पोंभूर्णा-११

गोंडपिपरी- ४५

राजूरा-९८

चिमूर- ५०

वरोरा- १२८

कोरपना-८७

जिवती- १५

इतर-२०

Web Title: Over 41 thousand 408 patients overcome corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.