आरोग्य शिबिराचा सात हजारांवर ग्रामस्थांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:34 AM2021-09-16T04:34:06+5:302021-09-16T04:34:06+5:30

वरोरा : तालुका शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा तालुक्यातील ३९ गावांमध्ये घेण्यात ...

Over 7,000 villagers benefited from the health camp | आरोग्य शिबिराचा सात हजारांवर ग्रामस्थांनी घेतला लाभ

आरोग्य शिबिराचा सात हजारांवर ग्रामस्थांनी घेतला लाभ

Next

वरोरा : तालुका शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा तालुक्यातील ३९ गावांमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व उपचार आणि नेत्रतपासणी व चष्मा वाटप शिबिराचा सुमारे सात हजारांवर रुग्णांनी लाभ घेतला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, युवा सेनाप्रमुख तथा महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम, वरोरा-भद्रावती विधानसभा संपर्कप्रमुख संजय काळे यांच्या निर्देशानुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुका वरोरा आणि लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा तालुक्यातील ३९ गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसार राबविण्यात आलेल्या या शिबिराचा सात हजार २०० ग्रामस्थांनी तर नेत्रतपासणी व नाममात्र शुल्कात चष्मा वाटप कार्यक्रमाचा ४,५२० गरजू रुग्णांनी लाभ घेतला. शिवसेना वरोरा तालुकाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिरांच्या यशस्वितेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, युवा सेना जिल्हा सरचिटणीस मनीष जेठाणी, युवा सेना तालुकाप्रमुख भूषण बुरीले, उपतालुकाप्रमुख विपीन काकडे, लक्ष्मण ठेंगणे, सागर पिंपळशेंडे, राजू राऊत, दिनेश यादव, अतुल नांदे , गणेश चिडे यांनी परिश्रम घेतले.

150921\img_20210915_092740.jpg

warora

Web Title: Over 7,000 villagers benefited from the health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.