७१ हजारावर नागरिकांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:57+5:302021-05-22T04:26:57+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ९४० जणांनी तर आजपर्यंत ७१ हजार ९२७ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, ...

Over 71,000 citizens defeated Kerona | ७१ हजारावर नागरिकांनी केली कोरोनावर मात

७१ हजारावर नागरिकांनी केली कोरोनावर मात

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ९४० जणांनी तर आजपर्यंत ७१ हजार ९२७ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, ५२० कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून १४ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८० हजार २२३ वर पोहोचली आहे. सध्या ६ हजार ९५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ९४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख ६७ हजार ६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरातील ६० वर्षीय पुरुष, बालाजी वाॅर्ड येथील ८३ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, नगिनाबाग येथील ७२ वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील टेकाडी येथील ८७ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ५३ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील ७७ वर्षीय महिला, किरमिटी मेंढा येथील ७० वर्षीय महिला, मोरगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुष, यवतमाळ जिल्ह्यातील चिंचाळा मारेगाव येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बाॅतक्स

आजपर्यंतचे मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत१ हजार ३३९ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार २४१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४५, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

बाॅक्स

असे आहे बाधित

चंद्रपूर पालिका १४७

चंद्रपूर तालुका २८

बल्लारपूर १०३

भद्रावती ३२

ब्रम्हपुरी ०६

नागभीड ०३

सिंदेवाही ०७

मूल ७३

सावली १३

पोंभूर्णा ०५

गोंडपिपरी ०७

राजूरा १७

चिमूर ०३

वरोरा २४

कोरपना ५०

जिवती ००

इतर०२

Web Title: Over 71,000 citizens defeated Kerona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.