पावणेदोन लाखांवर चाचण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:29 AM2021-01-03T04:29:25+5:302021-01-03T04:29:25+5:30
जिल्ह्यात शनिवारी ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर २२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर ...
जिल्ह्यात शनिवारी ३६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर २२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६८ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३५, तेलंगणा एक, बुलडाणा १, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा १ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
शनिवारी बाधित आलेल्या २२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सहा, चंद्रपूर तालुका एक, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी एक, मूल एक, चिमूर चार व वरोरा येथील चार रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्यापही आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.