जिल्ह्यातील पाच रेल्वे फाटकांवर ओव्हरब्रीज
By admin | Published: February 6, 2017 12:39 AM2017-02-06T00:39:17+5:302017-02-06T00:39:17+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील मध्ये रेल्वे मार्गावरील काही समपार फाटकांवर (लेव्हल कॉसिंग) रेल्वे ओवरब्रिजची उभारणी करण्यासाठी्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेकडे मागणी केली होती.
मंत्र्यांची माहिती : आदिलाबाद गडचांदूर रेल्वे लाईनच्या कामास लवकरच प्रारंभ
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मध्ये रेल्वे मार्गावरील काही समपार फाटकांवर (लेव्हल कॉसिंग) रेल्वे ओवरब्रिजची उभारणी करण्यासाठी्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेकडे मागणी केली होती. रेल्वे मंत्र्यांनी त्यांच्या या मागणीची दखल घेवून जिल्ह्यातील येन्नोरे- नागरी, चिकणी- वरोरा, माजरी- भांदक, ताडाळी- घुग्घुस येथील दोन लेव्हल क्रॉसिंगवर रेल्वे ओवरब्रिज उभाऱ्यास मान्यता प्रदान केली आहे. यासाठी निधीची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये या सर्व ओव्हरब्रिजच्या उभारणीस प्रारंभ होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
सेवाग्राम- बल्लारशाह रेल्वे मार्गावरील एलसी नं. १९, येन्नोर- नागरी ८०४/१२-१४ किमी या समपार फाटकावर ओव्हरब्रिजच्या उभारणीसाठी १६.५ करोड रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असूनएलसी नं. २७, चिकनी- वरोरा किमी ८२६/२९ वरील ओव्हरब्रिजसाठी १६.५ कोटी एलसी नं. ३९ ए ताडाळी- घुग्घुस किमी ८६५/१६ व एलसी नं. ३९ ताडाळी- घुग्घुस ८७५०२-३ वरील ओव्हरब्रिजकरिता अनुक्रमे १५ कोटी व १६.५ कोटी रुपयांचा निधीस मंजुरी प्राप्त झालेली आहे. मागील अनेक वर्षापासून या सर्व समपार फाटकांवर रेल्वे ओवरब्रिज उभारण्यात यावेत, अशी मागणी त्या परिसरताील रेल्वे प्रवासी व नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या सर्व लेव्हल क्रासिंग फाटकांची माहिती रेल्वे मंत्र्यांना सादर करुन या सर्व फाटकांवर ओव्हरब्रिज उभारण्याची मागणी केली होती.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ना. अहीर यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात या रेल्वे ओव्हरब्रिजला निधी उपलब्ध करुन मान्यता प्रदान केंल्याने गेल्या अनेक वर्षापासूनचा रेल्वे ओवरब्रिज उभारणीचा प्रलंबित प्रश्न सुटला आहे. नुकत्याच घोषित केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राकरिता रेल्वे विकास प्रकल्पांना चालना देण्याकरिता ५,९५८ कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतुद केली असून आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इइतिहासातील हा सर्वाधिक महसूल आहे. (शहर प्रतिनिधी)
इटारसी- नागपूर- बल्लारशाह तिसऱ्या
लाईनसाठीही आर्थिक तरतूद
गत वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजुरीप्राप्त कामांना आर्थिक तरतूद उपलब्ध होवून रेल्वे मंत्र्यांनी इटारसी- नागपूर- सेवाग्राम- बल्लारशा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या लाईनला मंजुरी प्रदान केली आहे. सेवाग्राम बल्लारशाह या तिसऱ्या लाईनच्या निर्मितीकरिता ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासोबत चांदाफोर्ट व चंद्रपूर रेल्वे स्थानकही एकमेकांना जोडल्या जाणार असल्याने रेल्वे प्रवाशांकरिता महत्पवूर्ण सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच आदिलाबाद- गडचांदूर रेल्वे लाईनच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.