शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर मात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:11 PM2018-03-17T23:11:20+5:302018-03-17T23:11:20+5:30
आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यापीठस्तरीय सर्वच बाबी आॅनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह विद्यार्थ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली़ नवीन आव्हाने उभी आहेत. यावर मात करण्यासाठी रचनात्मक व्हावे, असे प्रतिपादन महाराष्टÑ राज्य प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित संशोधन पत्रिका प्रकाशन व सत्कार समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मामीडवार प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, उपप्राचार्यडॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, संशोधन पत्रिकेचे समन्वयक डॉ. विजय वाढई, डॉ. कविता रायपूरकर आदी उपस्थित होते. विद्यापीठ प्राधिकरणावर कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही विचार मांडले़ सिनेट सदस्य मामीडवार, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. प्रमोद शंभरकर, संजय रामगीरवार, वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. विजय वाढई, डॉ. एस. बी. किशोर, डॉ. सुनीता बन्सोड, यांच्यासह नेट परीक्षा उत्तीर्ण, प्रा. संदेश पाथडे, प्रा. आशिष शेंडे, सेट परीक्षा उत्तीर्ण प्रा. निशांत शास्त्रकार, प्रा. स्वप्नील भगत, प्रा. वेदांत अलमस्त, प्रा. सरोज यादव आणि प्रा. कविता रायपूरकर व प्रा. राहुल कांबळे यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.
मामीडवार म्हणाले, शांताराम पोटदुखे यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी दिली़ माझ्यासारखे अनेक व्यक्ती या क्षेत्रात सक्रिय कार्य करीत आहेत़ त्यामुळे नव्या दमाने काम करण्याचा उत्साह वाढला़ यावेळी डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. प्रमोद शंभरकर यांचीही भाषणे झालीत. शांताराम पोटदुखे म्हणाले, चंद्रपुरात शिक्षणाचे दालन सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली़ त्यातून शिक्षणाचा विस्तार झाला़ ही परंपरा यापुढेही कायम राहणार आहे़ प्रास्ताविक प्राचार्य डॉ. इंगोले, संचालन डॉ. शरयू पोतनूरवार यांनी केले़ रक्षा धनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.