बोरमाळा नदीघाटावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:37 PM2018-11-21T22:37:23+5:302018-11-21T22:37:57+5:30

चार ब्रास रेती वाहतूक परवाना असताना हायवा ट्रकमध्ये पाच ब्रासपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक अडवून प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने पाचही ट्रक पाथरी पोलीस स्टेशन येथे जमा केले आहेत.

Overload overload traffic from Bormala river basin | बोरमाळा नदीघाटावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक

बोरमाळा नदीघाटावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक

Next
ठळक मुद्देरा. कॉ. कार्यकर्त्यांनी अडवले ट्रक : चौकशीसाठी ट्रक ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली/गेवरा : चार ब्रास रेती वाहतूक परवाना असताना हायवा ट्रकमध्ये पाच ब्रासपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास रेतीची वाहतूक करणारे पाच ट्रक अडवून प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने पाचही ट्रक पाथरी पोलीस स्टेशन येथे जमा केले आहेत.
सावली तालुक्यातील बोरमाळा नदीतील रेतीघाटावरून अवैधरित्या नियमबाह्य रेतीची वाहतूक मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. बुधवारी रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे सावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील अवैध रेतीचे पाच ट्रक अडविले. याबाबत तहसीलदारांना माहिती दिली. पाचही ट्रक पाथरी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.
यावेळी राकाँचे सावली तालुकाध्यक्ष अनिल स्वामी, माजी जि. प. सदस्य यशवंत ताडाम, माजी पं. स. उपसभापती मनोहर ठाकरे, ईश्वर नवघडे, किशोर मलोडे, लीलाधर चौधरी, संतोष लाडे, वामन भोपये, सिध्दांत लाडे उपस्थित होते.
प्रशासनाची दिरंगाई
चार ब्रास रेती वाहतूकीचा परवाना असताना पाच ब्रासपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होत असल्याने ट्रक अडविल्याची माहिती रा. कॉ. च्या कार्यकर्त्यांनी सबंधित विभागाला दिली. मात्र सावलीचे नायब तहसीलदार चिडे, नायब तहसीलदार कांबळे चक्क चार तास उशिरा घटनास्थळावर पोहचले. त्यामुळे प्रशासनाकडून रेती माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप रा. कॉ. कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

महसूल विभागाने ताब्यात घेतलेले ट्रक सुरक्षिततेच्या दृष्टीने पाथरी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सदर प्रकरण पोलिसांच्या अखत्यारीत नाही. यावर काय कार्यवाही करायची आहे, ते महसूल विभाग करतील.
- जावेद शेख
ठाणेदार, पोलीस स्टेशन, पाथरी

Web Title: Overload overload traffic from Bormala river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.